________________
प्रसंग चवतीसावा : ४५५ या अर्थी श्रेष्टिराया। कथा ऐक ऐक सखया । शब्दबाण न मारि वाया । करावी दया सर्वजीवासी ॥१३७॥ कौशंबी नगर विस्तीर्ण । राजा तेथे अंधमादन। सर्व सुखी पूर्वपुण्य । पुत्रवत् पाळन रयतेचे ॥१३८॥ तेथे जैनधर्मी सोनार । नाम तयाचे देवांगार। स्त्रिया शीळवंति सुंदर । पुत्र पौत्र सर्व सुख त्या ॥१३९॥ एकदा राय मुद्रिकाहस्ते । रत्नजडीत करि तेथे । रत्न ठेवि न्याहावरौते । मुनि अवचित पाहिले ॥१४०॥ ते स्वामी उदंडि अहार । मासोपवासी तपःशूर । रत्नत्रय दी धरंधीर । पंचप्रकार मंत्रमुद्रा ॥१४१।। प्रथमगृहि मंत्र न ये । द्वितीय धामि धूम्र होये । युगुळांगुळि मुनिराये । सोडोनी पाहे तृतीयधाम ॥१४२।। तेथे नसे भक्त सागार । पुढे पाहे तुर्य मंदिर । तेथे श्रावक धरोनि धीर । पढगावि मंत्र त्रिविध ॥१४३॥ तेथे तिष्टले मुनिराये । पुढे विधी श्रावक न ये । अनागारा तुर्य अंतराये । आंगोळि हृदय पंचमी॥१४४॥ मुनिराये धीर धरोनि । कर्मपरीक्षा पाहु ध्यानि । याच देहि कर्म फेडोनि । मोक्षसदनि सुख भोगु ॥१४५॥ नीट चालले रस्त्यान । दूर उभे श्रावकजन ।। दूरस्थ देखिले सोनारान । करि नमन घाबरा तो ॥१४६॥ रत्न ठेविले न्याहावरि । सूचना करि त्रिमंदिरी । स्त्री म्हणे बोलावा लोकरि । कळस करि घ्या त्वरेन ॥१४७॥ पाणिपानि नमोस्तु स्वामी । तिष्ट तिष्ट ममग्रधामी। त्रिवार उदक सुद्ध पद्मी । प्रक्षाळ पनि उच्चासन ॥१४८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org