________________
२२ : आराधना कथाकार्षे
1
तत्छत्रिका घरोनि स्व स्व करि । पापात केला सत्वरि । तदा छत्रिका तारु धरि । जैसे अंबरि गृद्धपक्षि ॥ ८१ ॥ मग धरातलि उतरोन । माध्यान रात्रि दोघे जन । वदनि वदोनि जिन नाम | केले गमन देशांतरी ॥८२॥ तदानिशाचिय अंति । बौध गुरू तो दुर्मति ।
कुमाराहित माराया प्रति । भृत्याहि प्रति आज्ञापिले ॥ ८३ ॥ तदाज्ञा घेवोनि लौकर । वेंधिले सप्त तलावर । तेथे न दिसति कुमार । ते स्वामिसि सत्वर सांगीतले ॥८४॥ तत्वाक्य करोनि श्रवण । म्हणे धावारे धावा सर्वे जन । ग्राम वाटिका मार्ग सोधुन । आनावे धरोन मम तस्कर ॥ ८५ ॥ मग भृत्य धावले दसदिसि । सोधिते झाले सर्व ठायासि । न सापडले पापिष्ठासि । दोन चार कोसि गवेसता ॥८६॥ तदा ते सर्वे फिरोनी आले । स्वामिप्रति वदु लागले । ग्रामिवनि पर्वत पाहिले । आम्हासि सापडले नाहि कोठे ॥८७॥ तदा वदे तो धर्माचार्य । अश्वावरि आरूढ व्हावे । शीघ्र जावोनि धरावे । छेदोनि टाकावे मस्तक ||८८॥
तदा होवोनि तुरंगारूढ । धावति एकमेकाचे पुढ | तत्च्चरण धूलि पाहोनि गाढ । निःकलंक अमूढ बंधुसि म्हणे || ८९ ॥ दादा पश्य पश्य माघारि । धावुनि आले आपणावरि । निश्चय प्राण घेतिल वैरी । क्वचित बुद्धि विचारि प्राणरक्षनि ९० तु ज्ञानि एक-पाठि असे । दर्शनोद्योत करिसि भर्वसे । यदर्थि स्वकिय प्राणरक्षे । मम मोह फासे न पडावे ॥ ९१ ॥ ममाशा सोडोनि सत्वरि । प्रवेसावे या सरोवरि । कमल पत्र धरावे सिरी । राहिजे स्थिरि घडी एक ॥ ९२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org