________________
प्रसंग दुसरा : २१ निद्र-स्त शब्द ऐकोनि असा । उठोनि पळति दस-दिशा । कितियक वदति बोबड भाशा । भय-ग्रस्त पिशा-सारिखे ॥६९॥ तदा ते बंधू दोघे जन । एकाकि बैसले उठोन । मुखे वदति जिन जिन । नसे देहभान नेत्रि निद्रा ॥७०॥ जिन नाम ऐकोनि श्रुति । तत्क्षणि धरोनि दोघाप्रति । भृत्य घेवोनिया जाति । स्व-स्वामिप्रति निवेदिले ॥७१।। सेवक वदति तयासि । स्वामि आज्ञा असे कैसि । तसिक्षा करू कुमराहिसि । स्वामि कार्यासि असो तत्पर ॥७२।। सेवक वाक्य ऐकोनि सत्वर । म्हणे हे दुष्ट जैन कुमार । नेवोनि सप्ततलावर । ठेवावे तस्कर मम ज्ञानाचे ॥७३॥ मग उगवला दिन मान । स्मशानांतरि नेऊन । मारावे हे दोघे जन । तुम्हासी मम आज्ञा ऐसे ॥७४॥ लत्वाक्य ऐकोनि सत्वरि । नेवोनि सप्तम भूमिवरि । स्थापोनि गेले स्व स्व घरि । करिति चाकरि अधम्मपणे ॥७५।। उक्तंच बाणशणि मंत्री-स्तंभी वादीच मौनजा। स्वामि-कार्यन् कुर्वति षडेति सेवकाधमा ।।७६।। निःकलंक होवोनि भयभीत । वदे जेष्ट बांधवात । आपण येवोनि नृजन्मात । किंचिदात्म-हित नाहि केले ॥७७।। अत्यंत प्रयत्न करोन । ज्ञान रत्न केले उत्पन्न । तदु द्योतन केला आपण । वृथा मरण आले असे ॥७८|| भयभीत पाहोनि बांधवासि । अकलंक वदे तयासि । मृत्युचे भय काय धरिसि । जीवनोपायासि विचारिजे ॥७९॥ तत्क्षणि पूर्व पुण्योदये । आतुरला एक उपाये । हे छत्रिका होवोनि सहाये । करील कार्य सिद्धि त्वरे ॥८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org