________________
प्रसंग दुसरा : २३
मार्गे जाता मज कारण । पाहोनि ते पापि दुर्जन । माघारे जातील मारून । मग त्वा निघोन जावे त्वरे ॥ ९३॥ बंधु वाक्य ऐकोनि ऐसे । अत्यंत शोक करितसे । म्हणेरे प्राक्तना केले कैसे । दुःख डोहि कैसे मज लोटिले ||१४|| निःकलंक म्हणेगा बांधव । तू एक असता चिरंजीव । दुष्ट बौधाचा फेडसील ठाव । ममान्तर्भाव पूर्ण होईल ॥ ९५ ॥ शोकाचा हा अवसर नव्हे । सरोवराचा करि आश्रय । कैसेपरि प्राण रक्षावे । जेन्हे मन कार्य सिद्धि होईल ॥ ९६ ॥ बंधुवाक्य ऐकोनि सत्वरि । प्रवेश केला सरोवरी । पद्मपत्र धरोनि सीरि । तदाश्रय स्थिरिभूत राहिला ॥ ९७ ॥ चित्ति स्मरि बीजाक्षर | पंचगुरू नमस्कार । त्रैलोक्यामाजि असे सार । जगादाधार सौस्यदाई ||१८|| केवल पद्मपत्राश्रय । म्हणाल यत्ने धरिला आहे । हृद धरिले सद्गुरू पाय । तोचि आश्रय थोर असे ||९९|| उक्तंच न चक्रे केवलं तेन । शरण्यं पद्मपत्रकं । अनन्य शरणीभूतं । शासने च जिनेशिनां ॥१००॥ मग पळतसे निःकलंक । तदा पुसति मार्गस्थ लोक । कारे पळस करीत शोक । कष्टकारक मुखांतरि ॥१०१॥ कुमर वदे पथिकाकारण । लौकर पलावे सर्वे जन । मागे लागिले वैरी जन । मनुष्य पाहूनि प्राण हरति ॥ १०२ ॥ तत् शब्द ऐकोनि परिठ । दोघे होवोनि यकवट । मार्गि पलु लागले नीट । तदा पातले दुष्ट येवोनिया ॥ १०३॥ पलता पाहोनि युग्मनर । वदति हेचि आपले चोर । मग धरोनिया सत्वर । छेदोनि शीर गेले त्वरा ॥ १०४ ॥
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org