________________
प्रसंग बत्तीसावा : ४३१
जटा मोकळ्या सोडोन । कुविद्येचे धरल ध्यान । तत्समयी विद्याप्रसन्न । कराग्री येवोन बैसलि ॥१२३॥ ते पार्वति पाहोन । रूपकरनी विद्यानिपुण । दोघि स्त्रिया रूपलावण्य । करिति गायन सप्तस्वरि ॥१२४॥ त्यास पाहोनि भस्मासुर । म्हणे तुमचं कोन नगर । पर्वताख्य आमचे नगर । पर्वतराजा विद्याधर ।
महासुर प्रतापी तो ॥१२५॥ महेशपुत्र म्हणे अंतरि । मम पित्याचा तोचि वैरि । क्रोधे गेला नगरांतरी । प्रळय भारि करितसे ॥१२६॥ ज्याच्या सिरि ठेवि हस्त । भस्म करि तया क्षणात । पर्वतराजा विद्यावंत । दिवस सप्त युद्ध जाले ॥१२७॥ दोघे क्षेदक्षीण जाहले । स्वस्वस्थळासि पोहचले। भस्मासुर मिथ्याबळे । तप योजिले अघोर ॥१२८|| असो त्याचे वर्णन फार । करिता पापाचा विस्तार । पर्वतकन्या महाचतुर । आलि त्वरे त्या ठाया ॥१३९॥ रूपकणि विद्या केलि । ईंद्र अप्सरा सुंदर बाळि । गायन सप्तस्वर मंजुळी । नेनकमळि पाहे शूर ॥१३०॥ म्हणे तूं कोन्हाचि गे नार । ते म्हणे मम धनि विद्याधर । सुर म्हणे ममांतर । पूर्ण कर मनकामना ॥१३॥ ते म्हणे भस्मासुरासी । तुम्हि नाचा अम्हासरसी। हस्त ठेवोनिया कटासि । हृदयासि पाणिस्पर्श ॥१३२॥ स्कंधावरि ठेविति कर । तैसेच ठेवि भस्मासुर । नृत्य करि महाचतुर । मस्तकि कर ठेविती नारि ॥१३३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org