________________
४३० । आराधना - कथाकोष
पर्वतकन्या अतिचतुर । मेघबाण सोडिला स्वरे । अग्नीशांत मोहासी पूर । वाहावला रुद्र तत् समयी ॥ १११ ॥ सावध जाला म्हणे अंतरि । विद्याशक्ती बळभारि । क्रोधे तप्त तो त्रिपुरारि । त्रिशूळ करी सज्ज केला ॥ ११२ ॥ ऊर्ध्वं करोनिया हस्त । क्रोधे झुगारि गगनात । पार्वति देखोनि तयाते । तुक खायते सोडि बाण ॥११३॥ तया माघे नयनबाण | पंचबाणाचे संधान | रुद्र वेढिला शक्तिबाण । तया निवारन न करवे ॥ ११४॥ नयनबाण हृदयी लागला । महारुद्र व्याकुळ जाला । मानमदन हृदी खोचला । मूर्च्छित जाला भूमीशयन ॥ ११५ ॥ शक्ति जयस्वीते जाहाली । आपुले मंदिरासि गेलि । पिता माता संतोषली । विद्यवान भलि तू कन्ये ॥११६॥ इकडे रुद्र सावध जाला । मनि पश्चात्ताप केला ।
तत् क्रोध उत्पन्न जाला । म्हणे व्यर्थ गेला मम जन्म ॥ ११७ क्रोधे जाला तो संन्याशी । जटा आपट भूमिसी । तेव्हा तत्समयासी । पुत्र तयासी उत्पन्न जाला ॥११८॥ भस्मासुर नामाभिधान । पित्यास मागे वरदान | वैरियासि भस्म करिन । हस्त ठेविन सिरि त्याचे ॥११९॥ रुद्र संतोसला अंतरि । भस्मविद्या पठन करि । एकांत वनि साधन करि । वरद वैखरि वदयेला ॥१२०॥ पर्वतरायाचे जे दूत । ते सांगती पार्वतीत । तिन पुसोनि पितियात चाललि एकांत अरण्यासी ॥ १२१ ॥ तेथे तो पापि भस्मासुर । विद्या साधि तो अघोर । मौसादि नरसीर । गळाहार अंतरमाळा ॥ १२२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org