________________
प्रसंग बत्तीसावा : ४२९
ग्राम दिसे पर्वतासमान । पर्वतराजा विद्यवान । सुधमति राज्ञी सद्गुण । रूपलावण्य षड्गुणीते ॥ ९९ ।। तया संतत पंचपुत्र । साहावी कन्या गुणपवित्र । रूपलावण्यज्ञानसूत्र | विद्या सर्वत्र निपुणते ॥१००॥ रूपगुण ऐकोन कर्णी | विषयांध इछा धरोनि । कुविद्याबळे तया स्थानि । प्रधानगुणि प्रेरिला तो ॥१०१॥ तेने जावोनि स्वउपचारे । कन्या मागे बहु आदरे । क्रोधे तप्त विद्याधर । बळत्कारे तो सिद्ध जाला ॥। १०२ ।। दोघाचा संग्राम अद्भुत । दोधे विद्याधर बळवंत । युद्ध षड्मासपर्यंत । नाटोपत एकमेकासी ॥ १०३ ॥ पार्वती कन्या म्हणे ताता । मज आज्ञा द्यावि जी पिता । त्या जिंकिन क्षण न लगता । कायसि कथा पुरुषार्थी ॥ १०४ ॥ पिता म्हणे तूं धन्य कन्ये । परि महारुद्र बलवान | मम शक्ति विद्या द्विगुन । क्षणात जिंकिन तयासी ॥ १०५ ॥ तेव्हा ते पार्वती शक्तीरूप । तेजाद्भुत भानुस्वरूप । नेकप्रकृति सैन्याधिका । एकानेक पाचारिती ॥ १०६ ॥ विद्याधरि ते विद्याबळे | शस्त्रास्त्र महातुंबळ | महारुद्र अन्नी कल्लोळ | दोन्ही दळ मिळालि क्रूर ॥ १०७॥ वीरासि वीर सुरासुर । युद्ध करिति महाक्रूर । पार्वती शक्ती महारुद्र । विद्याभार बाण सोडिती ॥ १०८ ॥
शब्दबाण महातीक्ष्ण । तेनें झाकिले हृदयभुवन । प्रत्युत्तर सोडिला वाग्बाण | बाणे बाण निवारिला तो ॥ १०९ ॥
रुद्रे त्रिनेत्र उघडीला | अग्नीबाण धडाडिला । तेन हाहाकार जाला । पळू लागला सैन्यभार ॥ ११०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org