________________
४२८ : आराधना - कथाकोष
तथा नेक विद्याधर । कन्या अर्पिल्या शतोत्तर । आनंद रुद्रा जाला फार । काम तीव्र त्या खवळला ॥८७॥ दुरात्मा तो मुनींद्र भ्रष्ट । विद्याधरासी पीडि कष्ट । विद्याबळे हारितो दुष्ट । कामलंपट विषयांध ॥ ८८ ॥ विद्याबळे तो कामातुर | भोगविषय निरंतर | शताष्टनारि कष्ट फार । रुदितांतर निशिदिनी ॥ ८९ ॥ हे जानोनि त्या मुनिराया । बुधी पालट जालि तया । आपनिंदा ते करोनिया । धिक् वाया हा कामदुष्ट ||१०|| याने पिडिले समर्थाला । यानेच जितिले ईंद्राला । चंद्रब्रह्माविष्णुरुद्राला । कळंक लाविला यानेच ॥ ९१|| विद्या परत जालियासी । कामपरीषह सोशि ऋषी । शांतता लिंगविषयासी । ध्यानि मानसी वीतराग ॥ ९२॥ देवा मी जालो होतो भ्रष्ट | आता मला होति नर्क कष्ट । तव दर्शनेन दूरप्रष्ट । मार्ग सुभट सुधर्माचा ||१३|| ऐसा करिता मनि विचार । एकक्षण पश्चात्ताप थोर । क्षणात जाला कामातुर । पाहे नेत्र मुनि स्त्रियासि || १४ || एकही नये त्याचे ध्यानासी । पुसता जाला प्रधानासि । बहुसुंदर स्त्री आम्हासी । पाहावि त्वरेसि विध्याधरी ||१५|| प्रधान म्हणे अहो जी राया । एक आहे सुंदरतनया । तत् पिता विद्याधर बळिया । कन्या नृपातत्समान ।। ९६ ।। तो नये तुमचे हातासि । सीघ्र कोपोत्पन्न रुद्रासी । बोलाविले विद्याधरासी । विमानवासि सिद्ध जाले ॥ ९७ ॥ महारुद्र त्रिशूळपाणि | कुनेत्र तो तिसरा अग्नी । त्वरे बैसोनिया विमानि । शीखरपटनि आले पै ||१८||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org