________________
प्रसंग बत्तीसावा : ४२७ तेव्हा त्या बाहेर येवोनि । वस्त्रपाहाति व्याकुळ नैनि । त्यानि देखिला स्वामि मुनी । पीतासमानी पुसति त्या ॥७५॥ आमची वस्त्रे कोन्हे नेली । तुम्ही असतील देखिली । सांगा आमची लज्जा गेलि । पापे नेलि त्या दुष्टकर्म ॥७६॥ ते ऐकोनिया त्यासि बोले । मम ईछा पूर्ण कराल ! देहे मजसी समाल । सर्व मीळेल वस्त्राळिंकार ||७७॥ कन्या युक्त सांगती तया । तुम्ही मागा आमच्या पितिया । पूर्ण ईछा करील त्वया । सत्कुळस्त्रिया शब्द वदनी ॥७८॥ ते ऐकोन वस्त्राभरण । समीली तयाकारन । त्या पावल्या स्वपितृस्थान । सर्व निरोपन सांगितले ॥७९|| ते ऐकोन विद्याधरासी । आठव झाला हृदयासी। पाचारिले स्वप्रधानासी । मम कार्यासी सिद्धि करि ॥८॥ प्रधान चातुर्य अंतरी । स्वामिराजा नमोस्तु करि । विद्युजिव्हा तो बंधुवैरि । देवदास हारि राज्यासी ॥८१॥ ते राज्य द्याल जरि त्याला । कन्या अष्ट देउ तुम्हाला । राज्यलोभे तो भ्रष्ट जाला । विषयभ्रष्टला मुणि कुबुधी ॥८२।। ते ऐकोनिया वचन । सर्व सीद्धता मी करीन । जे कामिक दुष्ट जे जन । पाप दारुण का न करिती ॥८३॥ तदा विद्याधर मुनिसी । घेवोन गेला त्रिपुरासि । विद्याबळे देवदारुसी । जितिले त्यासी क्षणमात्रे ॥८४॥ विद्युजिव्हा राजी स्थापिले । देवदारु प्रधान जाले । महोछावासी राजे आले । आनंदले रुद्र मुनींद्र ॥८५॥ देवदारु तो विद्याधर । कन्याविवाह मंगळाचार । सकळ मिळोनि विद्याधर । प्रशंसा थोर करिताती ॥८६।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org