________________
४३२ । आराधना कथाकोष
विषयांध जे कपटिमूढ । याचे कुड त्याचेच पुढ । मस्तकि हस्त ठेविता दृढ । भस्मला मूढ भस्मासुर ॥१३४॥ पार्वती तेवि जई जालि । येवोनि पित्यासि भेटलि। सर्व नगरि आनंदलि । विघन गेलि निरसून ॥१३५॥ पार्वती म्हणे पितियासी । महारुद्र तो कुतपस्वी । आज्ञा द्यावि ता मजसी । क्षणात तयासि जिकिन ।।१३६॥ पर्वत म्हणे पार्वती बाळी । तो कुविद्येचा महाबळि । त्यासि नको करू कळि । अरण्यस्थळि आसो कैसा ॥१३७॥ पीताजी ऐका माझे वचन । आग्यावक्ष प्रेरिता प्रयत्न । अंगा स्पर्शला करिल विघ्न । निर्मूळ करिन त्यास मी ॥१३८॥ म्हनोन निघालि त्वरित । गेलि ते तपोवना तौत । रूपकरणि विद्या तेथ । षोडशवर्षात भिल्लनी ॥१३९॥ गुंजा पितळ आळिंकार । स्वरूप दिसे गौराकार । मृगनयनि मनोहार । गोल पयोधर मन्मोहनी ॥१४०॥ ते ऐकोनि महातपस्वी । नेत्र उघडोन पाहे ऋषि । कोन हे अप्सरा वनासी । एकांतासि भेटली आम्हा ॥१४१॥ तिचे पाहोनिया वदन । नैनासि न्याहाळि नयन । चहुदिसो करि वदन । मुखचुंबन करू पाहे ॥१४२।। कामिक जेका कामातुर । भील्लनि धरली बळात्कार । काम नावरे महारुद्र । अहोरात्र सप्त दिन ॥१४३॥ रूपक रनि विद्या भिल्ली । पर्वताचि दरि ते जाली। लिंगरेत नदी लोटली । श्रमि जाहालि दोघ जन ॥१४४॥ क्षणेक शांत होवोनि । महारुद्र विचारि मनी। मम तपाचि जालि हानी । मनि क्रोधाग्नि धडाडिला ॥१४५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org