________________
प्रसंग बत्तीसावा : ४२५
एकदा रौद्र परपुत्रासी । ताडिता पाहे चेलना त्यासी । रुद्र नामाभिधान त्यासी । अन्याय करिता नित्यशः । क्रोधे त्यासी चेलना वदे ॥५२॥ कोन्हाच पोर जाति कोन । संतापवित कुलक्षण । ते ऐके रुद्र तो वचन | याचे कारण काही आहे || ५३|| श्रेणिकासी पुसे सत्वरी । मम तात सांगा झडकरि । राजा म्हणे पिशाच्चपरी । चेलनाउदरि जन्म तुझा ॥५४॥ रुद्र म्हणे हे असत्य । जैन धर्म सत्य सत्य । पाळनपिता तुम्ही सत्य । परि यथार्थं सत्यचि सांगा ॥५५ ॥ श्रेणिक गुप्त सांगे त्यासी । तैसाच निघाला त्वरेसी । आठव्यवन आरध्यासी । पाहिले पित्यासी दिगंबर ||५६ || नमोस्तु केला तीनवार । आपनिंदा तो करि थोर । दीक्षा मागे त्या वारंवार । कृपासागर मुनि तात ॥५७॥
मुनि समजले अंतरी । दीक्षा दिली ममता करि । ग्यारा आंग पठन करी । श्रुतसागरी निपुण तो ॥ ५८ ॥ विद्या पंचशत प्रवीण । विद्याधर विद्याविमान । हृदयात स्फुदे मदन | सौख्य पुण्य क्षयकारक ||५९|| विद्यागर्व जाला तयासी । गेला गोकर्णपर्वतासी । गुरूसमवेत विद्याभ्यासि । तापनयोगासी ताप तीव्र ॥ ६०॥ गुरूसी वंदना करोनिया । विद्या दाखवितो पितिया । सिंहव्याघ्रादि रूपभया । तास पितिया लाडेकोडे ||६१|| स्वामि म्हने वो रे रुद्रये । वृथा चेष्टा रे करो नये । स्त्रीनिमित्य तवहृदय । कष्ट होय दुष्टमानसे ॥६२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org