________________
४२४ : आराधना-कथाकीव
त्यान गुरूआज्ञा घेवोन । एकलविहारी तपोवन । गिरिकंदरि एकान्तस्थान । योग आतापन साधित ||४०|| एकदा श्री वर्धमान । तीर्थंकर समोशरण । वंदनार्थं सकळ जन । जेष्टमतिन गमन त्वरा ॥४१॥
महाटवी वन निबिड । वर्षाऋतु लागली झड । दंत वाजति खडाखड । मार्ग पुढ चुकलि तेथ ॥४२॥ काळ गुंफा तिने देखिली । महाकष्ट तेथे गेलि । एकांत अंधारी पाहिली । त्यात बैसलि वस्त्र पीळी ||४३|| सात्यकी मुनि तया स्थळी । तो पाहे नेत्रकमळि | जेवि घृतघट अग्नस्थळि | हृदयकमळ पापबुधी ॥ ४४ ॥ | तत्समयात शीलरत्न । गमाविल त्या मुनीन ।
हा कष्टं कामांधे नैनेन । पापी पापाच काय न कर्ती ॥ ४५ ॥ तत्समयी गर्भोत्पत्ती । तेथोनि निघे त्वरा गती । राजगृहचैत्यालय स्थिति । दर्शना येति नरनारी ॥४६॥ चेलनादेवी देखोनिया । जलप्रवाह नेवद्वया । हृदयोद्भव महामाया । चेलनाहृदयी आलिंगित ॥४७॥ माया मोह करोनि शांत । भगीनीस सांगितला वृत्तान्त |
त्याने ठेविली तेचि गुप्त । सम्यक्त्वी आच्छादीत दोषासी ॥४८॥ नौमास पूर्ण जाल्यावरि । जेष्टा प्रसवे गुप्त मंदिरी । 1 पुत्र जाला चेलने उदरी । जनात उच्चारि श्रेणिक || ४९|| आनंद महोत्सव केला । पुत्र तो वृद्धीत पावला । दुष्ट कोधी करि कळिला । चेलना बाळा ताडि त्यासी ॥ ५० ॥
जैसा वृक्ष तैसेच फळ । एरंडा कैच अमृतफळ । भेंड गाळिता कैचा गुळ । आराटि मवाळ कोठोनी ॥ ५१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org