________________
४१६ : आराधना-कथाकोष
ते ऐकोनिया स्वामीनाथ | तयासी सांगति यथार्थ । भानुनंदना एकचित्त । श्रवणार्थ सादर ऐकावे ||७६ || अमिताख्य' नामाभिधान । मांचपापुरी कर्दळीवन | स्त्रीसंयुक्त क्रीडेकारण आनंदवन पुष्प वास पै ॥७७॥ वसंत मास क्रीडा करीता । धूमषेणखग वनातैता । त्याने देखिली मम दुहिता । हारणकर्ता विद्याबळे ||७८ || वसंतास्त्रिया विद्याधरान । नेलि ते आकाशमार्गान । तत्क्षण मम पूर्वपुण्य । मुनिनयन देखियले ॥७९॥ ते मुनि रत्नत्रय धारी । सर्वं जीवाची हितकारी । तद्दर्शन महिमा थोडी । वंदना करी मी पंचांग ||८०|| तद्दर्शनाचा लाभ जाला । कुविद्येचा बंध तुटला । मुनि आशिर्वाद मला । विद्येचा जाला प्रकाश पै ॥ ८१ ॥ तेव्हा कैलास गिरिवरि । धूमषेण जितिला वैरि 1 वसंतस्त्रीया मम सुंदरि । आनिलि घरि आपुलिया ॥८२॥ तेव्हा कित्येक दिवसवरि । सुख भोगिले नानापरि । धनधान्य पुण्यानुसारि । जीवासि तारी गुरुराय ||८३|| अहो हो चारुदत्तश्रेष्टी । त्वा प्रश्न केला ऐक गोष्टी । धर्न इच्छालागी बहुत सृष्टी । होति कष्टी ते पुण्याविना ॥ ८४ ॥ एके दिनि दक्षिण दिशि । शिवमंदिर पत्तनासी । राज्ये केले मन उल्हासी । वैराग्य आम्हासि कारनेन ||८५|| संसार असार जानोन । राज्य दिले पुत्राकारण । वराहसिंह ग्रीव मिळुन । दोघे जन राज्य कुर्वती ॥ ८६ ॥
1
६. राजा.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org