________________
प्रसंग एकतीसावा । ४१७
चारणमुनिनायकासी । दीक्षायाचना केलि त्यासी। सुरमंत्र दिधला अम्हासी । जिनमुद्रेसी दिधले त्यांनी ।।८७॥ दिगांबरि तपःश्चरण । भवभ्रमणादिनाशन । चारुदत्त केले श्रवण । केले नमन गुरुरायासी ॥८८॥ स्वस्थ चित्ते तेथे राहिले । खगाधिप वंदने आले । ते दोघे पुत्र दाखविले । श्रेष्टिने पाहिले ऋद्धिवंत । तत् क्षणी तो छागचरेंद्र । नमस्कारी त्या मुनि राजेंद्र । चारुदत्त पाहिला नेत्र । दिधला मंत्र पूर्वभवि ॥१०॥ मंत्रगुरुसी जानोनिया । नमन करि द्वयपाया । करकमळ जोडोनिया । करि विनया पुनः पुनः ।।९१॥ ते पाहोनिया चारुदत्त म्हणे । हे नोव्हे मम उचित । ईंद्रमानवाअंतर बहुत । मी तुम्हाते नमस्कारितो ॥१२॥ ते ऐकोनि बोलला सुर । ऐका स्वामि मे भवांतर । अज्य काया पर्वतावर । रुद्रदत्त दुष्ट पामर ।
पापिन संव्हार केला माझा ॥९३॥ तेव्हा तुम्ही कृपा बहुत । पंच नमोकार कर्णात । देवोनीया संन्यासयुक्त । तिर्यंचयौनित सोडविले ॥९४॥ तत्प्रसादे स्वधर्मस्वर्गी। देव जालो धर्मानुरागी। तस्मात्गुरुत्वं मजलागी । मज पुण्यमागिला लाविले ॥९५॥ तेव्हा दिव्य वस्त्राभरण । ईंद्रे छागचिन्ह देवोन । पुनः पुनः करी नमन । परउपकारेन पूजनीक ॥१६॥ सर्व सुर तया वंदिती । वस्त्ररत्न बहु अर्पिती । तेव्हासी होय बारा प्रीती । दोघे करिताति पूजन ॥९७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org