________________
प्रसंग एकतीसावा : ४१५
रुद्रदत्तासि रौद्रध्यान । पापि निदर्य त्याचे मन । ज्यावरि आला तो बैसोन । त्याचच हानन ईच्छीतसे ॥ ६५ ॥ जीवहिंसा करोनिया । चर्म तयाचे काढोनिया | मांसगोळांगुळ घेवोनिया । पापिया पाप किं न कुर्वती ॥ ६६ ॥ चारुदत्त सरळचित्त | हिंसापापासी भयाभीत | सार पंचनमोकारात । संन्यास चिंतित अंतरी ॥ ६७ ॥ छागासि नौकार मंत्र दिला । सर्व संन्यास सांगितला | तत् पुण्ये तो इंद्रजाल । सर्वसुखाला स्वधर्म स्वर्गी ॥ ६८ ॥ श्लोक - धर्मिणो येन वर्त्तते । ज्ञातश्रीजैन सग्दीरः । नित्यं परोपकाराय । संति ते परमार्थतः ॥ ६९ ॥ | पाप्यान घेवोनिया चर्म । मांसगोळा करि अधम । भेरुंड पक्षी येता कृत्रिम । अपवित्रत्तम दावि तया ॥ ७० ॥ मांसगोळा धरिता चंचूसी । दोघे बैसले पुष्टियसि ।
४
पक्षि चालला रत्नद्वीपासि । आडवा तयासि द्वितीय पक्ष || ७१ ॥
द्वौ पक्षीया युध होत । मातुळ पडला समुद्रात । पापियासी तो अधःपात । पुण्यवंतात धर्मतारू ॥७२॥ चारुदत्त तो मनोहार । रत्नद्वीपा नेला पक्षींद्र | रत्नावेळ रत्न देखिले नेत्र । हर्ष थोर त्या हृदयासी ॥७३॥ रत्नत्रयधारी मुनिराय । नमोस्तु केला तत् पदद्वय । आशिर्वचन मुनिराय । दिधले अभय चारुदत्ता ॥ ७४ ॥
दोघांसी झाले संभाषण । सेटी पुसे मुनिकारण । दीक्षा घ्याव्या किं प्रयोजन | मजकारण सांगा स्वामी ॥७५॥
४. जीनवाणी, ५. बहिरसनापक्षी,
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org