________________
४१४ । आराधना-कथाकोष पंचगुरू साक्ष करोनी । त्यान तजिल अन्नपानी । येथे तारिल त्रैलोक्यधनी । आहारपानी तरि करू ॥५४॥ तेव्हा वनदेवी साक्षात । वाणि वदलि तया गुप्त । अहो पुरुष ज्ञानवंत । त्वा एकचित्ते परिसावे ॥५५।। प्रातःसमई या आडात । रस प्यावया गोधा' येत । पूछ धरी तू निःशंकित । यावे वरौत धीटपने ॥५६॥ ते श्रवण करोनी तया । हृदई जागृत प्रातःसमया। तत् घोरपड देखोनिया । जाला हृदया सावधान ॥५७॥ रसप्राशनाचे छंदात । पुछ धरिल दोहि हस्त । त्या जंतुसी बळ अद्भुत । गेला वरौत क्षणामध्ये ।।५८|| महावन बोलाडोनी । देशविदेश पाहे नयनी । रौद्रदत्त मामा देखोनि । विश्रांत सदनि जाहले ते ॥५९॥ एके दिवसी चारुदत्त । मातुळासि तो विचारित । रत्नदिपा जाउ त्वरित । पुष्कळ धनात मेळउ पै ।।६०।। छागपृष्ठावरी बैसले । पर्वतावरी वेंघले ।। मातुळ ज्यामाता विचारिले । ऐकावा बोल चारुदत्ता ॥६१॥ वनबस्त मारोनिया वेगि । चर्म घ्यावे त्वा वपुलागी । मांस घेवोनिया ते संगी। भेरुंडपक्षालागी दाखउ ॥६२।। त्याचे भक्ष ते मांसप्रीत । तेव्हा बैसोनि त्यावरीत । तेजाति आब्धी पैलतीरात । रत्नदिपात स्वईछने ॥६३॥ चारूदत्त विचारि मनी । हिंसा पाप पुण्याचि हानी । हे न करावे आमुचेनी । दुराचार झनी करू नये ॥६४॥
३. घोरपड.
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org