________________
प्रसंग एकतीसावा : ४१३
ते घेतलि त्याने ठकान । आनिक माघे त्याकारन | न देता सिंक घे वढोन । पाप्याकरण सुख नाही ||४३|| मनि विचारि चारुदत्त । उज्जनि नगरि धनदत्त । धनाज्ञा सींगळ दिपात । बैसोन झाजात गेलो मी ||४४ || झाज फुटले सप्तवार । तैसाच यथे दिसे विचार । रसकुपात प्राणहार | मरण त्वरे आले मज ॥ ४५ ॥ ते ऐकोनिया त्या ठका न । कुपिका एक भरोन देन । तुला मी वरे काढिन । सींक्यात ठेवने रसकुपी ॥४६॥ पाषान घालोनि सीक्यात | वन्हे वोढिता क्रोध त्यात । तोचि पाषान मारि त्यात । उपसर्ग बहुत पापिष्टा ॥४७॥ विष्णुमित्र कुतपस्वी । सिंककुपि गछं गृहासी । पुण्यविना मानवासी । द्रव्य तयासी प्राप्त कैचे ॥४८॥ कुपि नेता व्याघ्रभयान । भुमि पडला आतिवान । कुपि गेलि फुटोन | पुण्यावाचोन लाभ कैचा ॥ ४९ ॥ कुपामध्ये तो चारुदत्त । परस्तावा करि मनात । धन्य धन्य तो धनदत्त । द्रव्य बहुत सप्तवेळा ॥५०॥ आता येथे मी करू काय । माझी गति कैसी बा होए । आठवला तत् समय | जिनधर्म साधे आमचा ॥५१॥ श्लोक : सार पंचनमस्कारान् संन्यासेन समन्वितान् । दत्वा तेन पुनः पृष्टो भक्त्याऽसौ कूपसंस्थिताः ॥५२॥ टिका - निः छै नौकार मंत्रस्मरन । तेचि जाना सुख कारण । तेच सुगतीच साधन । घेतले अनसन तयाने ॥५३॥
२. चारुदत्तेन.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org