________________
४१२ । आराधना-कथाकोष
तस्मात पुण्य जिनधर्म । जिनभाषित षट्कर्म | चार दान पात्र उत्तम । उत्तमोत्तम जीवासि प्राप्त ||३२|| तेव्हा तो श्रेष्टी चारुदत्त । मातुळा पुसे व्यापारव्युक्त । तत् ग्रामी समुद्रदत्त । लक्षुमीवंत पुण्यपुरुषे ||३३|| त्याचे द्रव्य त्यानी घेतले । झाजी बैसोन द्विपनद्विपा गेले । धनार्थीकेन खरीद केले । बुधीहीन चालले स्वदेशा ||३४|| झाज चालले समुद्रात । पापे फुटले बुडाले तेथ । किंचित्पुण्य तरले तेथ । कष्ट बहुत पापास्तव ।। ३५ ।। एवं सप्तवेळा व्यापार । केला त्यानि वारंवार | नाहि पुण्याचा आधार । राजगृह नगर आले ते ॥३६॥ तेथे विष्णुमित्र तपस्वी । चारुदत्त पुसे तयासी । द्रव्यलोभ त्या जोग्यासी । सांगे तयासी धनयुक्त ||३७|| हे पुत्र ऐकावे वचन । नितंबपर्वत द्रव्यखान । तेथे कूपरस सुवर्णं । वन दारुण गुप्त असे ||३८||
तो दाखवितो तुजलागी । चाल जाउ लाग वेगी । धन आशा वनाचे मार्गी । चालले संगी मिथ्याती ||३९|| गोष्टि सांगति मार्गात । रसकुपिका घेवोनि हस्त । पुष्कळ सुवर्ण होय तुत । दारिद्रय समस्त गेले तुझे ॥४०॥
महा अरण्य भयंकर । पर्वत दरी मध्यांग थोर । अंधकूप सुवर्णाकार | पाहिला नजर चारुदत्त ॥४१॥
वनिक् बैसविला सीक्यात । कुपी देवोनिया कूपात । आडात उतरले चारुदत्त । रसकुपी भरि त्वरित दिल्ही ||४२ ॥
१. तुंबा.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org