________________
प्रसंग एकतीसावा : ४११ माता पिता करि विचार । परीक्षार्थ गणिकाघर । जैसे लेहु घालावे पोर । पंडित चतुर सीकवी ॥२०॥ तेवि त्या कळावंतनीन । कामकला सर्व निपुण । मेवामिठाई आदि करून । तांबूल भक्षन कैफिरत ॥२१॥ त्यान धारलि कुसंगत । विषयलंपट चारुदत्त । मद्यादिअभक्षभक्षित । व्यसन सप्त पापरासी ॥२२॥ असो पापे धनक्षय । द्वादशवर्षे केला विषय । षोडशक्रोडधन द्रव्य । गेले सर्व पापमार्गासी ॥२३॥ पापे कर्ता जाला भिकारी । धनहीन तो दरिद्री। कळावंती म्हणे वो पुत्री । द्रव्यहीन मैत्री न करि ॥२४॥ मैत्री करि भाग्यवंतासी । सोडोनि द्यावे दरिद्रयासी। तैसेच करितात तयासी । करि चोरीसी भोग भोगी ॥२५॥ घरस्त्रियाचे आभूषण । देवपूजेची उपकरण । ते पाहोन पित्यानयन । शब्दताडन धिक् धिक् पापिष्टा ॥२६॥ चारुदत्त क्रोध अंतरी । गेला तो मातुळाचे धरी । दोघे मिळोनिया व्यापारी । देशावरी ते चालले ॥२७॥ उलुखलाख्य देश थोर । मुशिरावर्त महानन । तेथे उदिम रोजगार । करिती व्यापार रुईचा ॥२८॥ बोली घेवोनी देश्यासी । जाता तामलिप्तपुरासी । ते उत्तरले वनवासि । वन वावनासी लागला ॥२९॥ कापुस गेला तो जळून । अग्रदंड पापि कारन । व्यापारसीधी पुण्याविन । नव्हेची जान सत्य सत्य ।।३०।। ऐसे जानोनिया समस्त । पुण्य करावे यथाशक्त । पुन्यविना नरदेह्यात । द्रव्यप्राप्त तयासि कैचे ॥३१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org