________________
४१० : आराधना - कथाकीब
एके दिनि जिनभुवनि । दोघ गेली भाव ध रोनि । पूजा अष्टविध करोनि । बैसली स्थानि दिलगीर ॥८॥ तत् पूर्वपुण्य करोनिया । चारणमुनी आले तदा । युगुळ तयासि देखोनिया । आनंद हृदया न माये ||९|| धन्य धन्य मम संचित । युगुळ द्वय जोडोनि हस्त । पंचाग करोनि नमोस्त । स्वामिरायात विनविती ॥ १० ॥ तुम्ही सर्वज्ञ जानताती । संसार आमचा करा तृप्ती । तुम्हावाचोनि त्रिजगती | आम्हा प्रति तारु नसेचि || ११ || तयाचा जानोनिया भाव । अवधिज्ञानी मुनिराव । हे कन्ये ! सुभद्रा ऐकाव । मनी धराव दृढतर ।।१२।। कुदेव कुगुरू कुशास्त्र । त्रिमूढ जनन पाहावे नेत्र | हृदयी धरा सिद्धान्तसूत्र । नौकारमंत्र गुरुमुखे ||१३|| गुरू तो जानावा निग्रंथ । जीवधर्म जानावा पंथ । सम्यक्त्व निश्चय यथार्थ । पुत्र सत्यार्थ होए तुम्हा || १४ || मुनिवाक्य त्यानी ऐकोन । नेम घेति दोघे जन । गुरूकृपा संपादोन त्यान । नमोस्तु करोन गृहाश्रमी ।। १५ ।। नेमक्रिया जईन धर्मं । तेक्ता सर्व मिथ्यातवर्म । सदा करिताति षट्कर्म । श्रावकधर्म दिने दिने ॥ १६ ॥ तत् कवने एके दिवसी । पुत्र जाला गुणरासी । नाम ठेविले महोछवेसी । उत्तम वंशी चारुदत्त ||१७|| दिन दिन वृद्धी करीत । पुण्यानुसार वर्ष सप्त । मातुळकन्या गुणवंत । सती रूपवंत पतिली ॥१८॥ तारुण्यभर दोघ जन । पूर्वपाप जाले उत्पन्न | स्त्रियचा केला त्याग त्यान । मित्रवचन नायके तो ॥ १९ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org