________________
प्रसंग एकतीसावा ॥ श्री वीतरागाय नमः॥
श्रीमत् जिनेंद्र पदद्वय । नत्वा सुरेंद्रामरराय । नमु सारदा भारती माय । दाखवी सोय कवित्वाची ॥१॥ पंचपरमगुरू वंदु । श्री जिनवाणी ज्ञानसिंधु । तत् वरदहस्त मी विबुधु । कथाप्रबंधु न जानेची ॥२॥ श्रोता ज्ञानवंत सज्जन । मोक्षमार्ग करा श्रवन । मनही न्यावे सांभाळोन । अक्षर न्यून लघु दीर्घ ॥३॥ श्लोक : श्रीजिनेंद्रपदांभोजयुग्मं नत्वा सुराचितं । श्रेष्ठिनं चारुदत्तस्य, चरित्रं रचयाम्यहं ॥४॥ टीका : चंपापुर नगर थोर । सूरसेन राजा सुंदर । सुरसेना सती गंभीर । पुण्यानुसार सर्वसुखी ।।५।। तेथे भानु नामक श्रावक । सुभद्रा सुंदरी धार्मिक । पुत्रार्थिजन देखोवेख । कुदेवभाक बंधखर्च ।।६।। ऐसे करिता बहुतदिन । स्त्रियाचे अनुचित भाषण । सर्व देवावरि पाषाण । एकही निधान पावे ना ॥७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org