________________
३९८ : आराधना-कथाकोष
टीका-देश मागध देशात । राजगृह त्या नगरात । धनमित्र धनसंयुक्त । पुण्यवंत षट्कर्मी ॥४३॥ धारणी स्त्रिया असे त्यात । तत् पुत्रोत्तम देवदत्त । सदाचारी तो ज्ञानवंत । धर्मपाळित जैनागमी ॥४४॥ त्याच ग्रामी आनंदमित्र । मित्रवती त्या स्त्री पवित्र । तयासी पुत्री कुनक्षत्र । जन्म सूत्र जाहली ते ॥४५॥ नाम ठेविले वीरवती । उपवर जालि गुणवंती। पाहोनिया ते रूपवंती । देवदत्ती ते परनीती ।।४६।। पूर्वकर्मबंधविधाता । तयासी कोन निवारिता । जैसा ऋणानुबंध होता । संसारपंथा वर्तती ते ॥४७॥ एके दिवसी देवदत्त । रत्नद्वीपाव्यापारकृत्य । जाता जाले बहुतादित्य । वीरवती ते कामोत्पन्न ॥४८।। तत् ग्रामी एक रजपुत । प्रचंडागार नाम त्यात । सप्तव्यसनी आतिरत । रूपवंत धनसमृद्धी ॥४९।। तस्कर विद्येचा चतुर । अंगी तारुण्याचा भर । नैन फिरवि तो गरगर । मित्राचार त्या ग्रामिकासी ॥५०॥ सदा हिंडे रस्त्यातुन । पानपट्टी हाती घेवोन । कानि कुंडल हालवि मान । वीरवतीन पाहिला तो ।।५।। त्यान पाहिल तयासी । नयनबाणनयनासी। काम उद्भवला मानसी । जालि दोघासी खूण दृष्ट ॥५२॥ नित्य तो ये मध्यरात्री । दोवा जडली महामैत्री । धनपुत्राची दुष्ट पुत्री । करि कलत्री जारकर्म ॥५३॥ विषय भोग अनेकसुख । मेवामिठाई गोडी चोख । जायफळादि तांबूलमुख । मुखात मुखे फुकिताती ॥५४॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org