________________
क्रोधध्यान नरक गती । चौन्यांशी लक्ष दुःख भोगिती । असो करीती ते भोगिती । ज्ञानी चित्ती समज धरी ॥३२॥
प्रसंग एकोणतीसावा : ३९७
राजा गेला वनगव्हरी । पश्चात्ताप हृदई करी । धिक् धिक् जिन संसारि । वैराग्य अंतरी उद्भविले ॥३३॥ म्हणे आता करावे काय | पाहावे श्री सद्गुरूचे पाय । तरीच पापाचा होईल क्षय । दीक्षेशिवाय दुजे नाही || ३४ ॥ ऐसा मनी करी विचार । तव भेटले गुणसागर । तरणतारू भवसागर । नमोस्तु निवार त्यासी केला ||३५|| केला विनय त्या स्वामिसी । दीक्षा द्यावी वो अनाथासी । तारावे शरणांगतासी । चरणापाशी ठाव द्यावा ||३६|| देवोनिया संजमधार । विद्या सिकविलि समग्र । तप करोनिया तीव्र । स्वर्गमंदिरसुखप्राप्ती ॥३७॥ श्लोक : मत्वा स्त्रीचरितं चेति, स्वचित्ते चतुरोत्तमैः । विश्वासो नैव कर्तव्यो, दुष्टस्त्रीणां कदाचन ||३८|| काव्य : स जयतु जिनदेवो देवदेवेंद्रवंद्यो ! मदनमदरीद्रध्वंसने यो मृगेंद्रः । भवभयभरहर्ता स्वर्गमोक्षप्रकर्ता । शिवयुवतिसुभर्ता शांतये शांतिदाता ||३९| ऐसे हे वैराग्यविशेषे । पुढे स्त्रीचरित्रविशेषे । श्रोता समजावे विशेषे । विशेषाविशेषे वैराग्ये ||४०||
कथा जालि एकतीसावी । पुढे ऐकावी बत्तीसावी । ऐकोनि चित्तात धरावी । दीक्षा घ्यावि जिनमार्गाची ॥४१॥
श्लोक : नत्वार्हतं जगन्मित्रं पवित्रं मुक्तिशर्मंदं । वक्षे वीरवतीवृत्तं सतां वैराग्यकारणं ॥ ४२ ॥
Jain Education International
"
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org