________________
३९६ : आराधना कथाकोष
नूतनस्त्रीभंग जाला । दुःखसागर उद्भवला । तेन साहेच पापनीला । क्रोध आला तियेचे मनी ॥ २० ॥ म्हणे माझी त्वा सांड केली । दूजि सवत परनिली । लज्जा नाही तुला वाटली | चांगली पाहली सवती मला ॥ २१ ॥ तिच मुख पाहिल्याविन । गोड न लागेचि भोजन । आता पाहे डोळे उघडोन । जैसी राक्षसीन कर्कषा ||२२||
राजा जेविता तयाम्होर । ठायात ठेविले ते शीर । ते दिसे महाभयंकर । राणीसमोर डाकीनी ते ॥ २३ ॥ ते देखोनिया नृप भ्याला । तैसाच तो निघता झाला । राणी घेवोन खड्ग भाला । राव लपला मंदीरात ||२४|| कपाट लावील डाकीनीन । बाहेर फुफाटे संपन | आपुला प्राण मी देईन । किंवा घेईन प्राण तुझा ||२५|| नानाप्रकारे ते जलपत । राव दडला मंदिरात । तव चंडांश झाला अस्त । गेली मंदीरात डाकीण ||२६| खड्ग उपसोनीया करी । स्तंभ होता तो सामोरी । सरसाउन हात मारी । राजा बाहेरी पळाला ||२७|| पळता देखील तयासी । भाला घेवोन लागे पाठिसी । सिंहबळ विचारि मानसी । जावे वनासी त्यागोनिया ||२८|| नृप निघाला ग्रामाबाहेर | पाठिसी लागली ते नार । मार्गात भेटले तस्कर । त्यानी ते नार धरियली ॥२९॥ अलंकार घेतला समस्त । दूर नेली ते अरण्यात | विटंबना केली बहुत | बांधिले हस्त वृक्षाखाली ||३०|| वस्त्र घेवोनिया ते गेले । पतिनिंदकी दुःख देखिले । ते नवजापवर्नीता बोले । श्वापदे केले त्या भक्षण ||३१||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org