________________
प्रसंग एकोणतीसावा : ३९५
ऐसी गोपवती राणी । सुख नसे रायाचे मनी। जाचनी सोसी निसिदिनि । अंतःकरणी दुःखी तो ॥८॥ एकदा पद्मखेट ग्रामासी । सहज गेला पहाव्यासी । कंटाळून गृहस्त्रियसि । त्या ग्रामासि स्थिरावला ॥९॥ तेथे कुनबी बळिराम । तत् कन्या सुभद्रा नाम । लावण्यरूप ते उत्तम । विहाव समारंभ केला पै ।।१०।। गोपवती दुष्ट पापिनी । विवाह ऐकिला श्रवणी । हृदई प्रजळला अग्नि । विचार मनी करीतसे ॥११॥ मातंग सवे घेवोनिया । निसि माध्यान्ही जावोनिया । मातृगृही सुभद्रा तया । निद्रिस्त ठाया गेली ते ॥१२॥ सवे होता जो का तस्कर । सीर छेदोनि निघे त्वरे । रूंड पडे धरनीवर । मस्तकमंदिर आनीले ॥१३।। पाहा हो स्त्रियाचे धारिष्ट ते । ढालगीळील म्हणति सत्य । गुप्तरूप मंदिरात । बैसली स्वस्थ कपटिनी ॥१४॥ प्रातःकाळी सुभद्राराणी । प्रेत देखीले राए नैनी। आकांत झाला सर्वाजनी । भयभीत मनी जाहाले ॥१५॥ माता पिता रूदन करी । म्हणति कोन्हे केली मारी । शीर नेले कैशापरी । पूर्ववैरी राक्षसभूत ॥१६॥ असो प्रेतसंस्कार केला । राव स्वमंदिरासी आला । राणी पुसतसे तयाला । कोठोनि आला सांगा सत्य ॥१७॥ दुःखिस्त अंतरी राव । म्हणे काय तुज सांगाव । नका सांगु स्नान कराव । आधी जेवाव मग सांगा ॥१८॥ स्नान करोनि त्वरित । जेऊ बैसला मंदिरात । दुःख उद्भवले हृदयात । रुचि भोजनात कैचि त्या ॥१९॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org