________________
प्रसंग एकोणतीसावा : ३९९ लज्जारहित ते सुंदरी । शहर जालि ते माहेरी । मातापिता चिंता करी । म्हणे सासरी पाठवावी ॥५५॥ तत् समइ तो देवदत्त । गेला होता रत्नद्वीपात । रत्न खरीदी माल बहुत । घेवाया येत आनंदात ॥५६।। सर्वाचीही भेटी जाहली । स्त्रीयचि तर्क चित्ता आली। विषयासक्त चाल केली । मनसा जालि भोग इच्छा ॥५७॥ हर्ष धरोनिया चित्ती । आनंदश्रेष्ठी गृहाप्रति । सासुसासरा आनंद चित्ती । आदर करिती उपचार ॥५८॥ मार्गामधे तो येता येता। चोरे देखिले भाग्यवंता। सहस्रभट त्या मागुता । आला त्वरिता सासुगृही ॥५९॥ तद्दिनी तो प्रचंडाकारे । रजपूत महातस्करे । चोरी केली राजमंदिरे । फोडिला भांडार रायाचा ॥६०॥ कोटपाळ धरिले त्यासी । जकडबंदी केली त्यासी। जावोनी सांगति रायासि । सुळावर त्यासी धाला वेगी ॥६१॥ भारोभार देतो सुवर्ण । रायासी यावे पुसोन। नृपेंद्र म्हणे तो दुर्जन । घर लुटून आणा त्याते ॥६२॥ तीन पृच्छा केल्या रायाला । सीघ्र त्या सुळावर घाला। पापी शूळारोपण केला । दिवस झाला अस्तमान ॥६३॥ मसानभूमी भयंकर । सर्व गेले अपुले मंदिर । तो ऐकोनिया समाचार । वीरवती झुरे मनामध्ये ॥६४।। त्या चोरासी गुंतले मन । मैत्राला जावोनी पाहीन । भ्रतार निजला ठेवोन । फीरंग घेवोन निघाली ॥६५॥ कासोटा घालोनी बळकट । वेगी चालली झटपट । ते देखिली सहस्रभट । म्हणे हे कोठ जाती पाहू ॥६६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org