________________
३८६ : आराधना-कथाकोष
बळद होत मंदिरात । तयाचिये मुखवरूत । मंचक वेष्टिला कट्टयासूत । सेज्याकर ते आरूवर ॥३३॥ तदा कडारपिंग पापी । मदोन्मत्त जेवि कपि । उल्लु चालला आपोआपी । गुप्तरूपी तो पुसे बापा ॥३४॥ पिता म्हणतसे तयास । श्रेष्ठी गेला षड्मासास । भोग भोगी ईछामानस । करि वास त्याचे गृही ॥३५॥ महाहर्श झाला तयासी । गेला श्रेष्ठीचे गृहासी । येता देखिले सुंदरीसी । पलंग तयासी दाखविला ॥३६।। पापी हर्श आनंदान । आंग टाकिले उभ्यान । आत पडलासे सत्रान । जेवि पतन नर्कभूमी ॥३७।। तेवि दुर्बुधी तो पडला । एक प्रहर व्याकुळ झाला । श्रेष्ठी सांगे त्या दासीला । पानी तयाला पाजावे गे ॥३८॥ दोन मुष्टी चने न पानी । नित्य देइ तू त्यालागुनी । मळमूत्र त्याच ठिकानी । नर्कभुवनि भोग भोगी ॥३९॥ तीन दुन साहा महिने । वनीक आले सर्वजने । पापी बाहेर काढोन । पक्षाप्रमान चित्रिला तो ॥४०॥ पिंजऱ्यात तो घालोनिया । करद्वय ते कशुनिया । कृष्णमुख त्या करोनिया । दाखवावया राजियासी ॥४१॥ श्रेष्ठी राजसभे जाऊन । सांगे त्या सर्व वर्तमान । राया जाला क्रोध उत्पन्न । जैसा अग्नि प्रळइचा ॥४२॥ त्यासि दंड तो शास्त्रांतरि । रोहण करावे गर्दभावरि । घालावे त्या वेशाबाहेरि । राजा करी तसेच त्या ॥४३॥ प्रधानपुत्र दोघे जन । पक्षि हे आनिले द्वीपाहून । मीरवत चालले रस्त्यान । हासति जन पाहोनिया ॥४४॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org