________________
प्रसंग अठ्ठावीसावा : ३८५
कंडारपिंग अद्यदिनी । उतावळा कामांध नैनी । सेठीगृहा धाडी कुटनी । यावे घेवोनि प्रियंगेसी ॥२१॥ कुटन गेली पैज घेवोन | आताच येते मी घेवोन । श्रेष्ठी स्त्रीयापासी येवोन । मिष्ट वचन सांगितसे ॥ २२॥ काही कार्यास जात होते । तुम्हास पाहिले अवचिते । कार्यसिद्धी होईल येथे । धराल चित्ते तरी तुम्ही ||२३|| तुमचे भाग्य मोठे सबळ । प्रधान पुत्र सुकुमाळ | तैसाच होईल तुम्हा बाळ । मनसोहळे पुरतील ||२४|| आनिक रत्न अलंकार | मनवांछित भोग वस्त्र । मेवामिठाई ते पवित्र । धनिवर घेशील बाई ||२५|| वाणि ऐकिली दासिची | आग चेतली तळव्याची । चडकनि लाविलि हस्ताची । वेणी तयचि आसुडली ||२६|| कुटन धरणी पडली । लत्ताप्रहर कुस्त केली ।
मग ते काकुळती आली । पाया पडली दीनवदन ||२७|| दीनदयाळ पतिव्रता । सोडली गेली शिक्षा कर्ता । तत् ऐकिली तारवार्ता । दचकली चित्ता शीलवंती ॥२८॥ म्हणे कपटी तो प्रधान । तत्पुत्र महादुर्जन | परस्त्री अभिलाष मन । ऐका वचन देहधनी ||२९||
तुम्ही करू जाता उद्योग । पापी करती शीलभंग । मग मी करीन प्राणत्याग । तुम्हायोग्य हे कार्य नव्हे ||३०|| श्रेष्ठी समजला अंतरी । स्वीयेसी म्हणे धीर धरी । होईल ते पाहेन जरी । चिंता न करी मम प्रिये ॥ ३१ ॥ शुभदिन पाहोनि त्वरा । सर्व चालले द्वीपांतरा । श्रेष्ठी राहिला गुप्त घरा । चमत्कारासी पहावया ॥ ३२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org