________________
३८४ । आराधना कथाकोष
श्लोक - धिक्कामांधजनं लोके, लज्जाभयविवर्जिता । एता कामी न जानान्ति कार्याकार्यं शुभाशुभम् ||९|| टीका
112011
टीका- धिक्कार तया कामांधासी । मातेचि लज्जा नाहि त्यासी । न जानति पापपुण्यासी । गति त्यासी सप्तम नरकी ॥ ११ ॥ पुत्राचा लोभ धरोन । ते सांगे भ्रतारालागोन । स्वामि पुत्राचे पापी मन । परस्त्रीगमन इच्छितो ॥१२॥ प्रधान म्हणे ऐक स्त्रिये । पुरूषासी गे दोष काय | पुवासी म्हणे स्थिर आहे । विलास सोय करितो मी ॥ १३ ॥ पापात्मा मिथ्याती प्रधान । कपटी रायासी जाऊन । सांगे हीत वर्तमान । चित्त देवोन ऐका राया ।। १४ ।। अहो रत्नद्वीपी कौतुक । किंजल्प पक्षी बहुतेक । रत्ने पक्षी आणावा एक । प्रमाण तुक ऐक प्रभू ।। १५ ।। प्रक्षिप्रभाव महाव्याधि | दुर्भिक्ष मरण इत्यादि । शत्रु तस्कर दुष्टबुद्धि । इत्यादि नाशात पावति ॥ १६ ॥ कुबेरदत्त तुमचा श्रेष्ठी । विचक्षण चातुर्यदृष्टी । पक्षि पिंजरा रत्नपेटी । आनील जगजेठी पै ॥ १७ ॥ बोलावुनी सेठीप्रति । तयासी सांगे प्रधानयुक्ती । रत्नद्वीपा जावे त्वरीती । पक्षिया प्रति आना वेगे || १८ || द्रव्य घ्यावे हे त्वा सत्वर । झाजी बसावे अती त्वरे । श्रेष्ठी म्हणता बहुबरे । पाहु मातुर दिन सुधी ॥ १९ ॥ नृप निर्बुद्धि भोळाराजा । मंत्री कपटी आप काजा । आज्ञा द्यावी निघे सहजा । गृहभाजा प्रयाण सांगे ॥२०॥
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org