________________
प्रसंग अठ्ठावीसावा
॥ श्री वीतरागाय नमः॥
नत्वाहतं जगत्पूतं भारती गुरुपंकजं । वक्षे कंडारपिंगस्य ब्राह्मदोषकथानकम् ॥१॥ कपिला नाम नगरीत । राजा नरसिंह राज्य करीत । पूर्वपुण्य तो धर्मयुक्त । क्रियासंयुत्तपरायण ।।२।। तयाचा मंत्री तो सुमती । प्राणवल्लभा धनमती । कंडारपिंगाक्षपुत्रौत्पत्ती । महादुर्मती विषयिक ॥३।। त्याच नगरी एक श्रेष्ठी । दयाधर्मी सम्यग्दृष्टी । कुबेरदत्त सदा संतुष्टी । पंच परमेष्ठी पूजाभक्त ।।४॥ तयाची भार्या रूपसुंदर । पूर्वपुण्यसंचित फार । प्रियंगुसुंदरी चतुर । तारुण्यभर शीलवंती ।।५।। एकदा प्रधानपुत्रान । पाहिली ती मृगनयन । मदने व्याकुळ होवोन । पाप्याच मन भोगइच्छा ।।६।। तो जाय अपुल्या गृहासी । पापी पहुडला भूमिसी। धनमती पुसे तयासी । दुर्मानसी किं कारणात ।।७।। माते ऐक ममोत्तर । श्रेष्टी भार्या महासुंदर । तीसी मजसी प्रीत थोर । हे करशील तर वाचेन मी ।।८।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org