________________
३८० : आराधना-कथाकोष हा कळंक होईल दूर । तरीच घेईन अन्न आहार | कायोत्सर्ग स्तंभ आकार । जाप्य नमोकार दृढत्व ॥१४०।। शीळाचे प्रभावे करोनि । जानोनिया जिनशासनी । बाई सती तू सिरोमणि । प्राणहानि करू नए वो ॥१४१॥ त्वा असावे मनी निर्भय । श्रावक धर्मवंत राय । स्वप्न सांगोनि मी जाय । तुझाच न्याय उजळमाथा ।।१४२।। ऐसे सांगोनि देवी गुप्त । रायासि ते स्वप्न सांगत । पौळि कपाट होति गुप्त । सतीचेलनात मुक्तता ॥१४३।। तद्दिन उगवल्यावरी । कवाड बंद वेसी चारी । हाहाक्कार जाला नगरी । राजद्वारी जनाचा मेळा ॥१४४।। रूव सांगे स्वप्मभावा । नगरीमध्ये धांडोरा द्यावा । सतीने दरजा वोवाळावा । चरण डावा उघडील ।।१४५।। ऐसा धांडोरा आइकोन । नगरस्त्रिया करिती लेण । सोळा सिंगार करोन । करी घेवोन पंचारती ।।१४६॥ एकापुढे एक जाताती । पुरुष मिळाले समस्ती । राजविभूती सर्व येती । बौद्धमती पाहावयासी ॥१४७।। एक नेसली पीतांबर । पैठनी साडी उंच फार । पाटाउखा बाईत थोर । बुट्टेदार गुलचांदनी ॥१४८।। सुवर्णळींका रसपूर्ण । हरिद्राकुंकाचे लेपन । नयनी घालोनि अंजन । गजगामिनी हंसगति ॥१४९॥ सर्व मिळोन वेसिपासी । पूजा करिती भावेसी। वोवाळिती ते दर्वज्यासी । वामपदासी लाविताती ॥१५०॥ सर्व जाल्या नगरनारी । रायाचिय अंतःपुरी। राजकन्या सहपरिवारी । आळींकारी देवांगणा ॥१५१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org