________________
प्रसंग सतावीसावा : ३८१
सती सत्य पतिव्रता । वोवाळीती भावचित्ता। परि ते नुघडेचि तत्त्वतः । चित्ती चिंता राव करीत ॥१५२।। आहो हो मम नगरात । कोन्ही पापी आहे येथ सते । खबर घ्यारे तुम्ही समस्त । प्रधानात म्हणे भूपती ॥१५३॥ सर्व पाहल प्रधानान । जिनदत्त लज्जायमान । कन्येचा पाहे अवगुण । घरात बैसोन राहिला ॥१५४॥ प्रधान सांगे रायासी । सन्माने आनिले तयासी । सर्व वर्तमान रायासी । अनाचारासी समजले ॥१५५॥ राव म्हणे ते प्रतिव्रता । नीलीबाई रे गुणवंता। मन दाखवि जिनदत्ता । चाल तत्त्वतः कोठे आहे ॥१५६॥ नृपेंद्र आला चैत्यालयात । वंदिला त्रैलोकीचा नाथ । देवा यश देई आम्हात । प्रजा संतप्त माझी सर्व ॥१५७॥ राजा करी त्रिपदक्षिणा । नीली देखिली मृगनयना । तयासी वदे स्ववचना । चाल सदना आपुलिया ॥१५८॥ हे कन्ये ! ऐक वचन । कपाट उघडति तुझ्यान । माते चालावे त्वरेन । खुलासा करणहि रीतिचा ॥१५९।। तुझा सर्व समाचार । आळ घातली तुजवर । त्यास देईन दंड फार । तुझ्या नजर पाहे बाई ॥१६०॥ ऐसे म्हणोनि पतिव्रताते । नमन करोनी देवीते । साह्ये व्हावे वो कृपावंते । चालली त्वरित हर्शान ॥१६१॥ शुचिर्भूत होवोनिया । पंचारति घेवोनिया। मातापिता मिळोनिया । आया बाया श्रावकिनी ॥१६२।। जावोनिया वेशीपासी । बोलाविले त्या राजियासी । कळंक लाविला मजसी । आहे मजसी शीलवत ॥१६३॥
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org
Jain Education International