________________
प्रसंग सत्तावीसवा : ३७९
तुम्ही पुसा आपल्या गुरूसी । मग सांगेन मी तुम्हासी । तैसच सांगति बौद्धासी । त्या बाबासी क्रोध आला ॥। १२८ ।। क्रोधे उठला तानताने । आम्ही खादल्या काय म्हने । आता वरिक सत्यवचन | अंतर्ज्ञानी ज्ञान जाले तुम्हा || १२९|| ऐकोनि मीलिचा शब्द | बौद्ध झाला मनि स्तब्ध | म्हने न कळे गूढ शब्द । दृष्टाताब्द ज्ञान खोली ॥१३०॥ ऐक शिष्यावमन करून । चर्मखंड पाहे नयन । मग त्याचा जाला अपमान । गेले उठोन लज्जित ॥१३१॥ सासुसासरा तो दुःखित । अपेश आले मिथ्यातीत । दंश धरोन हृदयात | चूरी हातात दात खाती ।। १३२ ।। काय करावे न करावे । कैसे तरीही पळवावे । पाहती हृदयी उपाव । काही तरी डाव द्यावा ईसी ॥१३३॥ नीलीबाई जयवंत ते । रूपवंत शीळवंत ते ।
शास्त्राभ्यास करी नित्य । तीचि आत तद्वेश करी ॥ १३४॥
नीलीबाईचे मंदिरी । नित्य श्रावक येति घरी । जिनशास्त्र श्रवण करी । त्या दुराचारी पाहिल ते ॥ १३५ ॥ शब्द ठेविला त्यास तिसी । हे रत झाली परपुरुषी । बट्टा लाविला स्वकुळासी । सर्वजनासी प्रगट केले ॥ १३६ ॥ लोक आश्चर्य करिती । सीळवंती हे तो सती । ईचि कैसी जालि मती । पापी वदति हे ज्यारनी ॥ १३७ ॥ दुष्ट पापि जे का लोक । सतीसीच लाविति कळंक । तिचा साहाकारि निश्चैक । शब्दकळंक जाने सती ॥ १३८ ॥ जावोनि जिनमंदिरासी । नमन केले जिनेंद्रासी । निश्चय करिते मानसी । अनशनासी करि नेम ।। १३९ ।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org