SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 403
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ३७८ : आराधना-कथाकोष आतुबाई म्हणे नीलीत । नमस्कारि वो या गुरूत । आज गुरूमंत्र तुम्हात । गुरूवचनात घेई बाई ॥ ११६ ॥ गुरू निर्ग्रथ माझा बाई । व्रतनेम मंत्र निश्चियी । शीळव्रत घेतले आई । गुरू चतुराइ नेना तुम्ही ।। ११७।। आतु म्हणे हा कुळगुरू । यासी करी नमस्कारू । नीली म्हणे हे पापीनरू । मांसआहारु करिताती ॥ ११८ ॥ या नमस्कार करिता । पाप बैसेल त्याचे माथा । पापे जडेल दुःख व्यथा । शील वृथा जाईल बाई ॥ ११९ ॥ न न करावा तोहि गुरू । ज्याला स्त्रीपुत्त्रसंसारू । प्रपंचाचा पापभारू | पुण्याचा आधार नाहि त्या ॥ १२० ॥ ऐशा ऐकोनि वचनात । बौद्ध म्हणे न कळे तूत । याचे ज्ञान आहे बहुत । तुला किंचित् सांगतो ॥ १२१ ॥ अनंत आकाश संपूर्ण । अणुरेणु जीवगहन । अमर जीव जाय निघोन । मांसभक्षण पाप नाही || १२२|| पाप पुण्याची जे करणी । आम्ही जानो अंतरज्ञानी । बायकाची लटकी गानी | गुरूची करणी अगाध ॥ १२३॥ हे ऐकोनिया वचन | नीली म्हणे त्याकारण । आताचे जावे येथून | करू द्या भोजन आम्हासी || १२४ || आंतरज्ञान तुम्हा कैस । कळो येईल आम्हास | मग ते चाले मठास । भोजनास बैसली नीली || १२५ ॥ ते सर्व बाहेर निघाले । सेटिच्या दुकानी बैसले । बाहाना पाहु लागले । पाहता जाले हिंपुटीते ॥ १२६ ॥ 1 संन्याशी म्हणे पुसा तिला | वाहना आमच्या काय जापल्या । म्हणे अंतर्ज्ञान तुम्हाला । मग लोकाला काय पुसता ।। १२७ ।। Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.016054
Book TitleAradhana Kathakosha
Original Sutra AuthorBhattarak Chandrakirti
AuthorShantikumar Jaykumar Killedar
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1978
Total Pages814
LanguageMarathi
ClassificationBook_Other & Dictionary
File Size9 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy