________________
प्रसंग सत्तावीसावा : ३७५ टीका-हरिहर कामे जर्जर । भील्ली वृंदा रूपसुंदर ।
गंगया ऋषि महाथोर । ब्रह्मा किंकर उर्वसीशी ॥८०॥ ऐसे कामे गुंतले किती । कोन जाने त्याचि स्थिती । समुद्रदत्त जानोनि चित्ती । पुत्राची मति समजली ॥८१।। भो पुत्र काय तू नेनसी । जिनदत्त जाने सत्यार्थीसी। मिथ्यामतिसी ते कन्यासी । कल्पांतेसि देईना तो ॥८२॥ पित्याचि ऐकोनिया युक्ती । जिनधर्मी जाले मिथ्याति । नित्यदर्शन शास्त्र पढति । करिति भक्ती कामातुर ॥८३॥ मग ते एके वासरमणि । जिनदत्ताचे गृहा जाउनी । कन्या मागे स्नेहे करोनि । कपट मनी धरोनिया ||८४॥ जिनदत्त तो भोळा प्राणी । कन्या दिधलि पाणिग्रहणी । महोछाव पंचदिनी । जिनभुवनी अभिषेक ॥८५।। यानंतरे ते मिथ्याती। जिनमति जाले कार्यार्थी । पुन्हा ते जाले बोधति । कुकुरापति क्षीराजिन ॥८६॥ तथा ते दुर्बुधी मिथ्याती । इच्छाभोज बौधा देति । पापि मांस आहार घेति । ज्ञान सांगताती निर्दोष ।।८७॥ ते पाहोन नीलिबाई । कंटाळली स्वहृदयी। भ्रतारास सांगे उपाई । माझि सोई काई करिता ॥८८॥ मला माहेरी पाठवने । ते वर्ज केले मिथ्यातीने । तत् न्यारे घर बांधोन । समाधान राहिली तेथे ॥८९॥ नित्य श्री जिनराजपूजा । कल्याणदाता पापभंजा । तुर्यदान ते करि वोजा । आत्मकाजा शास्त्रश्रवण ||९०॥ साधर्मी श्रावक मिळोन । नित्यशः न्हवन पूजन । कीर्ति वाढली धर्म जैन । ते दुर्जन छिद्र पाहती ॥९१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org