________________
३७४ : आराधना - कथाकोब
तेथील राजा वसुपाळ । प्रजा पाळि जेवि का बाळ | देवदर्शन त्रिकाळ | करि सांभाळ तुर्यसंघा ॥ ६८ ॥ तेथे श्रेष्ठि जिनदत्त | नांदे समुदाय सहित । रूपवंत तो शीळवंत । जिनपूजा युक्त कर्तार ॥६९॥ तत् प्रिया ते जिनदत्ता । सत्यशीळ अन्नदाता | नीली नाम्नी तयचि सुता । इंद्रदुहिता तत्समान ॥ ७० ॥
सुखि नांदति पूर्वपुण्य । तत् ग्रामी मिथ्याति जईन । नांदे सधन पूर्वपुण्य | कुदेव कुगुरू ज्ञान सर्व ॥ ७१ ॥ नाम त्याचे समुद्रदत्त । सागरदत्ता स्त्री रूपवंत । तत् पुत्र सगर सुदत्त । रूपवंत मिथ्याति तो ॥७२॥ एकदा जिनेंद्रमंदिरि । महापूजा वाद्ये गजरि । दर्शना आले नरनारी । नीली सुंदरि करी पूजा ॥ ७३ ॥ अष्टविध करि पूजन । जाप्यमाळा करि घेवोन । कायोत्सर्ग करिति ध्यान । गुरुवचन नमोकार ||७४ || तत् समई सगर सुदत्त । पूजा पाह्यासि आला तेथ । स्यान पाहिली ते रूपवंत । विव्हळ चित्तात जाहाला ॥ ७५ ॥ काय हे स्वर्गदेवता | किंवा फणींद्राचि सुता । खेचरी व्यंतरी तत्त्वतः । रूपवंता गुणमंडित ॥ ७६ ॥ ते ऐकोन सागरदत्त । मित्र म्हणे नेनसी ईयत । श्रेष्टिसुता हे जिनदत्त | जिनदत्ता मात ईयची ॥७७॥ ते ऐकोनि अशक्त जाला । कैसी चढे मम हताला । मिथ्याति म्हणति आम्हाला । चिंताग्रस्त झाला कामिक ॥७८॥ श्लोक - हरिर्लक्ष्म्या हरो देवो, गंगया जडरूपया । उर्वश्या खंडितो ब्रह्मा, ता कामेन केन च ॥७९॥
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org