________________
प्रसंग सतावीसावा : ३७६ चोरासी दंड द्यावे तीन । सर्व धन घ्यावे हिरोन । मल्ल मुष्टी तीस देउन । सेनभक्षण कांसपात्री ॥५७॥ समुद्रदत्ता बोलाविले । पंच-रत्न त्यासी दिधले । प्रधान जैस सांगीतले । तैसच केले तयासि दंड ।।५८॥ तो श्रीभूती पाप पंडित । आर्तध्यान जाला त्या मृत्य । तिर्यंच कुगति त्या प्राप्त । कष्ट भोगीत दुर्गतिचे ॥५९।। ऐसे जानोनि भव्य प्राणी । चोरि दोष द्यावे सोडोनी । अभिळास परधनी । अतिचार मनि पाळावे ॥६०॥ अहो त्या समुद्रदत्तासी । श्रेष्टिपद दिधले त्यासी। जय झाला त्या श्रावकासी । पंचाणुव्रतासी धेति ते ॥६१॥ व्रतनेम पुण्यचि होत । पुण्यलक्षुमी अखंडित । पुत्र पौत्र संतत प्राप्त । अनुक्रमे जात मोक्षासी ॥६२।। काव्य-असुरसुरनरेंद्रैः खेचरेन्द्रैः प्रपूज्यो ।
जिनपतिरिह भक्त्या सर्वसंदेहहर्ता । तदुदितवरवाणी सारसौख्यस्य खाणी ।।
दिशतु मम शिवानि श्री प्रभाचंद्रदेवः ॥१३॥ जिनपति लोक्यनाथ । त्रैलोक्येंद्र पूजा करित । पूर्ण मनचे मनोरथ । संदेह हरत मिथ्यातीचे ।।६४।। येथे कथा जालि संपूर्ण । श्रोता व्हावे जी सावधान । पुढील कथे चित्त देन । सत्तावीस संपूर्ण जाहल्या ॥६५।। अथ श्री जिननाथस्य, नत्वा पादद्वयं हितं । चतुर्थाणुव्रताख्यानं, वक्षे नीलीसमाश्रितं ॥६६।। भरतक्षेत्र लाटदेशी । भगुकछ नाम नगरासी। धार्मिक राहाति वस्तीसी। जिनोक्तभासि ज्ञानवंत ॥६७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org