________________
३७६ : आराधना - कथाकोष
1
पाप्यानि वर्णील माहेर । तोहि कळला समाचार । जिनदत्त दुःखी अंतर । परि धुरंधर धैर्यवंत ॥९२॥ अग्नीत पडोन मरावे । अथवा जळात बुडावे | विषहि प्राशन करावे । मिथ्याती नसावे सोयरे ॥९३॥ भोळा श्रावक जिनदत्त | सरळ नामी ज्याचे चित्त । जैसी करणी तैस त्या प्राप्त । धर्म करित निसिदिनि ॥ ९४ ॥ एकदा नीलीचा सासरा । विचारितसे तो अंतरा । नीलीबाई ज्ञानि सुंदरा । बौद्धासि मंदिरा आनावे ।। ९५ ।।
सुगताचार्याचे ज्ञान । नीलीबाई करिल श्रवण । बौद्धधर्मासी घेवोन । समाधान राहिल ते ॥९६॥ नीली गृहि श्वशुर आला । करद्वय नमस्कारिला । हे कन्ये ऐके शब्दाला । अमचे गुरूला भोजन दे ।। ९७ ।। ते महा अंतरज्ञानी । तयासमान नाही कोन्ही । त्याचे ज्ञान तुम्ही पाहोनि । उपदेश घेवोनि नांदावे ॥ ९८ ॥ ऐकोनी तयाचे वचन | तुमचे वचन प्रमाण । परि गुरू करावा जानोन । पाणि प्यावे सोघून मन ||१९|| देवगुरुशास्त्र त्रिरत्न । हे घ्यावी परीक्षा करून । तुमचे गुरूचे पाहीन ज्ञान । सुज्ञान कुज्ञान परीक्षा ॥ १०० ॥ तुम्ही सांगावे आमंत्रण । सामग्री द्यावि आणोन । करीन षट्रसपक्कान्न । द्यावे भोजन सूगतीसी ॥ १०१ ॥ सकळ केलि पाकनिष्पत्ती । बोलाविले बौद्धमति । पंचशत शिष्यसांघाति । भोजनाप्रति बेसले ॥ १०२ ॥ भोजन करिति नानापरि । गोडि घेतली वैखरी । आज्य वाढावे द्रोणभरि । घारि पूरी भिजवावया ॥ १०३ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org