________________
प्रसंग सव्वीसावा : ३६५
मायावाक्य ऐकोनि भूपति । सेवकासी वदे क्रोध उक्ति । शीघ्र बांधोनि प्रधानाप्रति । मारावे दुर्मति या कारणे ।। १६६ ॥ नृप आज्ञा होताचि ऐसी । भूत्याहि बांधिले प्रधानासि । कोरडे मारिति वेदना जैसि । नक्कवासी करिति नार्किक ॥ १६७॥
सहन नव्हे बंधताडन । घाबरा होवोनि प्रधान ।
शीघ्र सोडोनि दिधले रत्न । कर जोडून विनविति ॥ १६८ ॥ देवा मजवरि न किजे क्रोध । साटोपि उदरि ममापराध । 1 पापोदय उद्भवलि बुद्ध । अनर्घ्यं शुद्ध रत्न पाहुनि ॥ १६९ ॥ प्रधानासि भूपति म्हने । दुष्टा तुज काय होते उने ।
मत्सम भोगिसि राजमान्य । देश ग्राम सैन्य असे पुष्कळ ॥ १७० ॥
रत्न पाहोनिया एक । हरिले होवोनि पाइक ।
वृथा गांजिला वराक" । दया विवेक सांडोनिया ॥ १७१ ॥ तू होयेसि ब्राह्मण । म्हनोनि रक्षिला तव प्राण । त्वा जावे मम देशातुन । न दावि वदन मजकारने ॥ १७२॥ सवे देवोनि फार किंकर । काढोनि दिल्ला देशाबाहिर । पापाचे फळे करोनि थोर । दुस्कर दुःख भोगिती ॥ १७३॥
ऐसे जानोनि भव्यजन । कंठगत येईल प्राण | तन्ही न करावे मृषा" भाषण । दुःखकारण दुर्गतीचे ॥ १७४ | तस्कराचे पाहोनि साहस । नृपचित्ति उद्भवला हर्ष । जनसाक्ष करोनि नरेश । मंत्रिपद तयास दीधले ॥ १७५ ॥ पाहा पाहा हो भव्यनर । व्रतमहात्म्य करोनि तस्कर । प्रधानपद पावला थोर । पुण्यप्रचुर करोनिया ॥१७६॥
१७. कपटवाक्य, १८. कंगाल तस्कर, १९. असत्य.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org