________________
३६४ : आराधना-कथाकोष
मग त्वरे नृपसन्निध आला । मुख पस्रोनि हासू लागला । स्वामि हा सत्यवादि भला। ऐसा न पाहिला दुजा जगी ॥१५५॥ तस्कर आनी जुवारी । सत्य वदति क्षणभरि । ऐसे नाहि ऐकिले शास्त्री । अग्निभीतरि शैत्य कंचे ।।१५६।। अमोल्य रत्न सापडे जरि। मुनिचे मन न राहे स्थीरी । जो नर नित्य करिति चोरि । तो काय परहरि वस्तु ऐसी ।१५७) व्याघ्रामुखि पडल्या हरण । तो काय देइल सोडून । जगी ऐसा मूर्ख कोन । सार रत्न सोडूम देइ ॥१५८॥ जावोनि पाहिले त्वरित । डबा पाहिला खडखड रीक्त । माघारे फिरोन आलो धावत । सांगाव्यात तुज प्रति ।।१५९।। प्रधानास वदे नरवर । यान्हे चोरिला मम भांडार । त्रीणि रत्न अमोल्य सार । त्वा काढावे लौकर यापासून ॥१६०॥ तो मंत्रि नपाज्ञा करोन । त्यासी करू लागला ताडन । तन्ही वदे एकचि वचन । स्वामि म्या दोन नेले निश्चय ॥१६१।। तदा नृप म्हने हा मंत्री । आपन करोनि चोरी । दुज्यावरि करिति मारि । स्वकृत्य अंतरि न विचारिति ॥१६२।। नृप म्हने रे प्रधानायासि । वृथा ताडन का करिसि । जरी असे तुजपासी । तरी द्यावे मजसि हर्षचित्ते ॥१६३।। नृपवाक्य ऐकोनि प्रधान । म्हने सर्पमस्तकिचा मन । तयासि हस्त लावल कोन । मूर्खावाचून नृपवरा ।।१६४।। नृपगृहाचि वस्तुसार । जो करिल अपहार । तयाचा प्राण धन भांडार । हरे सत्वर भूपति ।।१६५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org