________________
३६२ : आराधना कथाकोष तद् रत्न पाहोनि भूपति । कारण पुसे सेवकाप्रति । म्हने स्वामि मद्वाक्य चित्ति । धरोनि मदुक्ति आइका ॥१३२॥ दोन प्रहर झालिया निसि । शृंखला लावोनि कपाटासि । तत्क्षणि निद्रा आली मसि । आला तद् वेलेसि एक तस्कर ।१३३॥ तदा मी होउन जागृत । कोन म्हनोनि पुसिले त्यात । मी तस्कर ऐसे वदत । तदा मत आश्चर्य वाटे ॥१३४॥ पुनपुन्हा पुसता त्याकारण । तो एकचि वदे वचन । पुनरपि पुसले त्याकारण । चालिलासि कोन कारिया ॥१३५॥ तदा तो म्हने मी राजमंदिरि । करायासी जात चोरी। सत्य तयाचि वैखरि । ममांतरि न वटे राया ॥१३६॥ तो तस्कर न दिसे मजसि । विनोदवाक्य वदिले त्यासि । लाभ झाल्या मज काय देसी । तो म्हने तुसि देईन मे ॥१३७|| जानोनि त्याचा शुद्धभाव । पुसिले स्थान आनि नाव । पुढे काय करीतो पाहाव । त्वा शीघ्र जाव कथिले असे ॥१३८॥ मग राजमंदिरि जाउनि । दोन रत्न आला घेउनि । एक मजप्रति देउनि । एक स्वस्थानि घेवोनि गेला ॥१३९॥ जैसे वर्तले राती । तैसे कथिले तूजप्रति । तद्वाक्य ऐकोनि भूपति । विनोदवाक्य त्याप्रति वदे ॥१४०॥ नृप म्हने रे दुष्ट किंकर । मम रत्न गेलेति फार । चोर केलासि सामीलदार । आनावे सत्वर त्याप्रति ।।१४१॥ तदा नपवाक्य ऐकोनि कणि । सर्वांगि भयभीत होउनि । नृपाचि आज्ञा घेउनि । तस्करस्थानि गेला त्वरे ।।१४२।। उभा राहोनि गुफाबाहेरि । मंदस्वरे हाका मारी । तस्करे ऐकोनि एके सरि । आला बाहेरि सत्वर ॥१४३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org