________________
प्रसंग सव्वीसावा : ३६१
मग उगविला दिनमान । गायन करिति बंदीजन । वाद्य वाजति धुमधुम । ग्रामजन होति जागृत ॥१२१॥ शीघ्र उठोनि भूपति । जिन जिन ऐसे मुखे वदति । सामाइक करोनि सुद्धचित्ति । नंतरि पश्यति चहुकडे ॥ १२२ ॥ डब्बा पाहिला तत्क्षणि । एक रत्न पाहिले नयनि । म्हने म्या ठेविले होते त्रीनि । त्यातोन दोनी काय जाले ॥ १२३॥ जरी चोर घेवोनि जाता । तरी एकचि काशा ठेविता । रानिप्रति म्हने हे कांता दोन रत्न ता असे ठेविले ॥ १२४ ॥ रानि म्हने काय उने घरि । दो रत्नाचि का करावि चोरी | राहोनि सागराभीतरि । वारि हारि कोन मूर्ख ॥ १२५ ॥ मग जावोनि सभास्थानि । भूप बैसला सिंहासनि । सभा घनवटलि मंत्र्याद्यकरोनि । स्वर्गभुवनि इंद्र जैसा ॥ १२६ ॥ तदा उठोनि दर्वान्दार । हृदइ करिति विचार ।
1
म्हने हे रत्न अमोल्य थोर । मज देवोनि चोर गेला गृहा ॥ १२७ ॥ पुन्हा कितियका वासरि । जावोनि नृपाचे मंदिरि ।
Į
चोरी करता सापडे करि" । न होता मारी सत्य बोलिला ॥ १२८ ॥
तदा मज धरोनि नेइल | कोरड्याचे मार देइल | सुलि फासि चढविल । सर्व हरील धन प्राण ।। १२९॥ हे रत्न दिसे मजकारण । महा दुखदाइ सप्र्पाहुन ।
1
अही घेइल एक प्राण । हरी धन प्रान दुःख भवभवि ॥ १३० ||
ऐसे विचारोनि अंतरि । रत्न घेवोनिया करि ।
त्वरे येवोनि सभाभीतरि । नृपासमोरि रत्न ठेविले ॥१३१॥
१३. हाती.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org