________________
३६० : आराधना कथाकोष
ऐसे जानोनि अंतरि । सत्यवाक् निरंतरी । बहुमान्य पावोनि धरावरि" । भवभवांतरि सौख्य पावल ।११०। मग तो जावोनि सत्वरि । वेंघोनि गेला राजमंदिरि । प्रवर्ततला कराव्या चोरि । स्वर्णारूप्य करी धरीचना ॥११॥ पाहता पाहता स्थान स्थानी । रुप्पकरंड पाहिला नर्यान । उघडोनि पाहिला तत्क्षणि । माजि रत्नत्रीनि पाहिले ॥११२।। रत्न पाहोनि अमोलिक । अंतरि करीति विवेक । म्हने कवनासि द्यावे येक । युग्म" सत्विक ध्यावे कौन ॥११३॥ जरी रत्न असते च्यार । वाटनि होति बरोबर । आपन दोन ठेविल्यावर । व्रतासी अतीचार लागला ॥११४॥ जरी त्याज देउ दोन । येकचि घ्यावे आपन । तरी स्थिर न होयि मन । लोभकारण उद्भवे ॥११५॥ तदा आठविलि एक बुद्धि । एक ठेवोनि त्यामधि । युग्म घेवोनि चालिला सुधि" । पडिहारा आधि हाक दीलि ११६ तो होता तदा जागृत । बैसला होता वाट पाहात । एक दिल्हे तयाचे हातात । दुजे त्यात दाखविले ॥११७॥ वदे होते तीन रत्न । डब्यामाजि एक ठेउन । घेवोनिया आलो दोन । दिल्हे त्यातुन एक तुज ॥११८॥ रत्न देवोनिया त्यासी । म्हने कार्य उद्भवे तुसि । येजो माझिया स्थानासी । बोलने तुसि मसि होइल ॥११९॥ ऐसे वदोनिया त्याला । ग्रामाबाहीर निघाला । शीघ्र गुफामाजि गेला । मग दूरि कराव्याला निशास्तम ॥१२०॥
१०. पृथ्वीवर, ११. दोन, १२. बुद्धिवंत.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org