________________
प्रसंग सव्वीसावा : ३५७
मोहनि कर्माचि जालि शांति । तदा विचारि स्वकिय चित्ति । म्हने मत्पिताचे गुहांति । द्रव्याप्रति काय उने ॥७६।। उत्पन्न होवोनि उंचकुलि । यासि लाविलि काजलि । गृहि धर्माचि केलि धूलि । कित्ति वनस्थलि म्या छेदिले ॥७७॥ संतापिले ग्रामजन । अपहारिले तद्धन । संचिले या स्थलि आणून । काय फल यापासून भोगिले ॥७८॥ कृत पापाचा संचय । जेन्हे भवभवि दुःख होय । येवोनिया मानवभवे । काहि बरवे नाहि केले ॥७९।। फार करिति पच्छात्ताप । स्वनिंदा करोनि क्षपिले पाप । मोडिला चौर्यकर्माचा व्याप । कृत कोप कुकर्मावरि ॥८॥ म्हने म्या चोरीकृत आर । स्वर्णरुप्य भरिले भांडार । रती एकहि नसे सार । तरि धिक्कार असो मज ।।८१॥ आता एकिय दिवसि । राजमंदिरी जावोनि निसि । चोरोनि आनावे रत्नासि । स्वर्णरुप्यासि नसे कार्य ।।८२।। स्वमनोरथ करोनि पूर्ण । सोडोनि द्यावे चौर्यकर्म । होत असे महत्पाप कर्म । येइल भोग भवभवि ॥८३॥ ऐसे विचारोनि अंतरि । मनवचकाय सोडिलि चोरी । अपेक्षा असे रत्नावरि । राजमंदिरि जावयाचि ॥८४॥ · अंगिकारिता सत्यव्रत । अशुभ कर्माचा जाहाला घात । जे पालिति दिनरात । ते वंद्य इंद्रात का न होति ॥८५॥ मग कौने एकिय दिवसि । दोन प्रहर कृष्ण निसि । नृपगृहि चोरी करायासि । धरोनि मानसि सत्यव्रत ।।८६।। तदा लवलाहे चालिता वाट । आडवा उन्नत असे कोठ । दरवाजे लाविले बळकट । तस्करानि दुष्ट काय करिति ॥८७॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org