________________
३५८ : आराधना कथाकोष तदा कपाटाचे खालेहुन । महत्प्रयत्ने करोन । माजी प्रवेस केला जान । सर्वांग संकोचुन सर्पवत् ॥८८॥ तत्पर्श कपाट वाजे खर्खर । जागृत झाला दर्वानदार । धावोनि धरिला तस्कर । पुसे सत्वर त्याप्रति ॥८९॥ तो म्हने तू होयेसि कोन । निसी जाहालि प्रहर दोन । तस्कराचिय सारिखा जान । कपाटाखालून आला कसा ॥९०॥ ऐकोनि तयाचि वैखरि । व्रत स्मरिले निजांतरि । म्हने मी चोर करावया चोरि । ग्रामांतरि जात आहो ।।९१।। त्याचे वाक्य ऐकोनिया । म्हने रे सत्य वदावे त्वया । कोन होयेसी जातोसि कासिया । कवने ठाया काय कार्य ॥९२॥ विद्युच्चर म्हने सत्य मानि । मी तस्कर निश्चय जानि । चोरी कराया लागुनि । राजभुवनि चालिलो ॥९३।। पुनपुन्हा वदे दर्वानदार । सत्य तू न ह्वासि तस्कर । परि कोन होय सांग सत्वर । विनोद फार काय करिसि ॥१४॥ विद्युच्चर म्हने मी चोर निश्चय । असत्य कासिया वदावे । जेन्हे दुर्गति दुःख होय । इहलोकि पावे घोरापमान ॥९५॥ पडिहार म्हने तयासी । जरी तू तस्कर होयसि । कौन्या साहुकाराचे गृहासि । चोरी करिसि जावोनिया ॥९६॥ विद्युच्चर वदे राजमंदिरि । जावोनिया करावि चोरि । अनर्थ्यवस्त घेवोनि सत्वरि । आपुले घरि जाइन ॥९७।। राजकिंकर वदे त्याप्रति । अमोल्य वस्तु लाभे तुजप्रति । सत्य वदावि उक्ति । त्यात मजप्रति काय देसिल ।।९८।।
७. वाक्य, ८. दर्वानदार.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org