________________
३५६ : आराधना कथाकोष
तदा तयासि वदे मुनि । पंचाणुव्रत गृहस्थाश्रमि । जो नर पाळि शुद्ध त्रीणि । तो त्रिभुवनि पुण्यवान्नर ॥६४॥ तदा तस्कर मुनित पुसे । देवा तद्वत पालावे कैसे । जरी सुगम असे । तरी निर्वाह भर्वसे होइल ॥६५॥ जे जे व्रत वदे यति । कठिन कठिन म्हने त्याप्रति । स्वामि मूषक मेरूप्रति । हालविति कैस्यापरि ॥६६॥ स्वामि वदति जे जे व्रत । न येत याचे चित्तात । गुरू वदे वेक्सा काय करित । ते ते करावे मत निवेदन ॥६७॥ तदा वदे तो अमि । स्वामि मी असे थोर कुकमि । चोरी करितो निसिदिनि । द्रव्य संचुनि खुसि मानितो ॥६८॥ मुनिराज वदे रे जरि । तुज न सुटे रे तस्करी । करसील तरि सुखकरि । परंतु अंगिकारि सत्यव्रत ॥६९॥ चोरि कराया जासिल । तराला हाति सापडसिल । कोन रे ऐस पुसतिल । तदा सत्यबोल बोलिजो ॥७०॥ जरी पडे प्राणसंकट । तरी न व्हावे व्रतभ्रष्ट । सत्यवाक्य दत्तसावे सुष्ट । ऐसे पालिजे प्रष्ट सत्यव्रत ॥७१॥ ऐकोनिया मुनींद्रवचन । स्वामि हे व्रत असे सुगम । द्यावे मज कृपा करोन । यत्ने करोन पालीन मी ॥७२॥ तदा मुनीने सत्यव्रत । दिल्हे विद्युच्चर तस्करात । यथा धन सापडे दरिद्रयात । हर्ष चित्तात मनि तैसा ॥७२।। नमन करोनि मुनिपदि । व्रतस्मरण धरोनि हृदि । जावोनिया गुफामधि । म्हने मम पापनदि आटलि १७४।। व्रतमाहात्म्य करोन । अशुभ कर्माचि जाहालि हान । शुभकर्म पुण्यपावन । यथा भान प्रकाशिले ॥७५॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org