________________
प्रसंग सम्वीसावा : ३५५
सर्व व्रतामाजी सार । जीवदयावत असे थोर । नित्य पाळिति जे नर । सेविति सुर तदंघ्रिकमल' ॥५३॥ जो नित्य वदे सत्यवानि । तो थोर पुरुष त्रिभुवनि । नृपतिआद करोनि । तद्वनि प्रमाण करिति ॥५४॥ जो स्वप्नांतरि न करि चोरि । परधन मानि सर्पापरी। तो पूज्य राजमंदिरि होय । तन्मंदिरि द्रव्य उत्कृष्ट ॥५५॥ जो नर पाळिति ब्रह्मचर्य । सुर नर सेविति त्याचे पाय । त्रिजगि वंदनिक होय । भवभवि पावे सार सौख्य ॥५६॥ • जो परीग्रहाचे करि प्रमाण । त्यासि न करे उल्लंघन । स्वाधिन करावे निजमन । करावे रक्षण निजव्रत ॥५७॥ गृहीधर्म भव्यजनाप्रति । ज्ञानसागर महायति । पृथक् पृथग्व्याख्यान करिति । उंच गति प्राप्त व्हाव्या ॥५८॥ गुफामाजि होता तस्कर । तेन्हे गडबड एकोनि थोर । म्हने काय खेळ खेळति पोर । जावे क्षणभर पाहावया ॥५९॥ तदा निघोनि गुफाबाहेरि । त्यां स्थळि जावोनि सत्वरि । उभा राहिला दूरि । नमोस्तु वदनांतरि वदे ॥६०॥ स्थिर चित्त करोनि । धर्मोपदेशा ऐकति श्रवनि । तदा कुमतिचि जाहालि हानि । प्रीति जिनर्मि उद्भवलि ॥६१॥ पुढे जावोनि मुनिप्रति । तच्चरनि करोनि नुति । कर जोडोनि करि वीनति । स्वामी भवसंतति करी दूर ॥६२।। म्या पाप केले बहुत । नसे त्याचि गनित । क्वचित्सुगम देवोनि व्रत । पुण्यमार्गात मिळविजे ॥६३॥
६. पादकमल.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org