________________
३४६ : आराधना--कथाकोष
1
दीक्षा घेवोनि दिगंबरि । मोक्षसुखाची ते पायरि । अंतःकाळि समाधीवरि । स्वर्गावतारी तो जाला ।।६९।। पर्वतपुत्र स्वमंदिरात | पंचविषय सुखोत्पन्न । मणइच्छा भोग भोगीत | संसारी अनंत भ्रमण ॥७०॥ तदा नारद देशांतरे । तीर्थयात्रा करि आदरे । जिनपदि जैसा भ्रमर । ज्ञान दिवाकर शोभतु ॥ ७१ ॥ तो आला फिरत फिरत । राजधामी वसुपर्वत । सज्ञान सर्व अलंकृत । नारदे पर्वत दृष्टी जाली ॥७२॥ बरे आलेत तुमी स्वामी । यज्ञी होम करावा तुमी । सर्व साहित्य केले अमी । मंत्रगामी सर्व मेळा ||७३|| सर्व मिळाले ब्राह्मण । पर्वत तयासी बोले वचन | अजाहोमाचे प्रमाण । तुम्ही सांगण विधियुक्त ||७४ || त्याहि अनिला अजापुत्र । नारदे पाहोनिया नेत्र । काय पाहिले तुमी शास्त्र । कैसा मंत्र ते होमक्रिया ॥७५॥ अजा म्हणजे घृत जान । तूप धान्य एक करून । होमाहुती द्यावि संपूर्ण । पाप दारुण जीवहिंसा ॥ ७६ ॥ पर्वत म्हणे मम जनक । होम करि त्रिवार्षिक । शास्त्र पाहता सकळिक । न्यायनीक मी वदतो ||७७ || ऐसा वाद प्रतिवाद । पर्वत प्रतिज्ञा करित । वसुराजा सत्यवंत । तो बोलेल सत्य तेचि करा ॥ ७८ ॥ प्रतिज्ञा माझी हे वेखरा । अजाहोम सत्य खरा । यास पडेल काही अंतरा । छेद करा मम जिह्वेचा ॥७९॥ तदा स्वस्तिमती बोलताहे । रे रे पर्वत त्वा पाप है । त्वत् पिता त्रिवर्षकर्त्ता हे । व्यर्थ त्वा हे प्रतिज्ञा केली ||८०||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org