________________
प्रसंग पंचवीसवा । ३४५ वीस कोडाकोडि सागर । तेव्हा एक पल्यविस्तार । ऐसे कल्पशतवर । भोगने दुर्धर येईल त्यासी ॥५७॥ असो हे बुद्धि ज्यास जसी । फळ भोगिति जैसी तैसी । करावे आत्मसार्थकासी । विचारी मानसी ब्राह्मण ॥५८॥ एकदा विश्वावसु राजाला । श्वेतरोम त्यान पाहिला । वैराग्य-विरक्त जाला । बोलाविला वसुपुत्र तो ।।५९॥ त्यास देवोनि राज्यभार । आपण गेला वनांतर । दिक्षा घेतलि दिगंबर । तप दुर्द्धर आत्महित ॥६०॥ वसुराजा राज्य करी । एकदा गेला वनांतरी । क्रीडा करिता पाहे नेत्री । पळी अधांतरि दिसताहे ॥६१॥ विस्मय पाहोनिया मन । म्हणे येथे काही कारण । परीक्षार्थ सोडिला बाण । स्तंभालागोनि पडे तळि ।।६२।। तेथे जावोनिया पाहे । स्पटिकस्तंभ अदृश्य आहे । त्यात घेवोन ये गृहे । गुप्तपाहे त्या ठेवितसे ॥६३॥ त्याचे करोनि सिंहासन । वर बैसलासे आपन । लोका सांगे सत्यवचन । अधर बैसन अमुचे ॥६४॥ सत्यवचन करोनिया । आकाशात अमची काया । ऐस्यापरि तो कपटिया । धूर्त माया जगासि दावि ॥६५।। मूढ लोक सत्य मानिति । जन सर्व सेवा करिती । ऐसे जे का वज्रमिथ्याती । कैसे तरति संसारासी ।।६६॥ क्षीरकंदब एके दिने । राज्यकृत्य पाहिले त्याने । पर्वतवसू दोघे जन । पापाचरण करिताति ॥६७।। ते पाहोनिया समस्त । संसारि होवोनि विरक्त । वैराग्य भावित भक्ति । गेला वनात मुनिपासी ॥६८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org