________________
३४४ : आराधना-कथाकोष चौध पढति जे का ज्ञान । त्यात सुबुद्धी दोघे जन । सुपुण्ये सुगतिपन । होइल जान तयासि पै ॥४५॥ दोघे जन पापी निंदक । पापे प्राप्त त्यासीच नर्क । ऐकोनि क्षीरकदंबक । तयाजवळि आले ते ॥४६॥ पाहोनिया त्या तपस्वीसी। नमन भावे केले त्यासी । आज्ञा दिल्ही तिघा शिष्यासी । जावे गृहासी सत्वर ॥४७॥ नमन करोन मुनिसी । प्रश्न पुसता जाला त्यासी । सांगा आम्हा सुज्ञानासी । जैनमत्तासी वदावे ॥४८॥ ऐकोनि तयाचे उत्तर । मधुरगीरा प्रत्युत्तर । धर्माधर्म सारासार । सागार अनगार द्विधा ॥४९॥ दशलक्षण त्रिपनक्रिया । भावना सोळा सांगोनिया । सप्ततत्त्व जीवादिदया। ऐकोनिया संतोष पै ॥५०॥ मग करद्वय जोडोन । विनति करि स्वामिकारण । चौधे करिता अध्ययन । वदले वचन ते सांगा ॥५१॥ मुनि वदति कामजीत । त्वं जिनभक्तिप्रसादात् । नारद तोहि ज्ञानवंत । दोघासी प्राप्त स्वर्गसुख ॥५२॥ वसुपर्वत दोघेजन । कुकर्म कर्ता नर्क भुवन । ऐसे ऐकता ब्राम्हणे । करि नमन मुनिराया ॥५३।। पुत्र गति नाहि चांगली । मुनिवचन सत्य बोली। ब्राम्हन चिंता लागली । वाट धरलि ग्रामाचि ॥५४॥ येवोनिया गृहाप्रति । बुद्धि शिकवी पुत्राप्रति । परि ते तव मिथ्यामति । सीनला चित्ति ब्राम्हण तो ॥५५॥ विचार करिता ज्ञानवंत । मुनिचे वाक्य नव्हे असत्य । कल्पकोडि दुःखप्राप्त । सत्यसत्य आगमार्थ ॥५६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org